टोकियो
येथे रविवारी होणाऱ्या जपान एफ-1 ग्रा प्री मोटार शर्यतीसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या सराव सत्राअखेर मर्सिडीस एफ 1 चालक लेव्हीस हॅमिल्टनने आपल्या अव्वल प्रतिस्पर्धांना मागे टाकत आघाडीचे स्थान (पोल पोझिशन) पटकाविले.
सरावाच्या सत्रामध्ये हॅमिल्टनने ब्रिटनचा चालक रसेलला मागे टाकले. रविवारच्या शर्यतीमध्ये हॅमिल्टन आणि रेडबूल चालक रसेल यांच्यात जेतेपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत चुरस अपेक्षित आहे.