वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब पोलिसांच्या एका साहाय्यक उपनिरीक्षकाची (एएसआय) शुक्रवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. खानकोट गावात एएसआय स्वरुप सिंग यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या डोक्मयावर गोळीबार झाल्याच्या खुणा निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वरुप सिंग हे गुऊवारी रात्री नवा-पिंड पोलीस स्टेशनवरील सेवेत हजर होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी एका वाटसरूने त्यांचा मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली.
प्राथमिक तपासानुसार सिंग यांचा मृत्यू डोक्मयाला एकच गोळी लागल्याने झाल्याचे पोलीस अधीक्षक जुगराज सिंग यांनी सांगितले. पोलिसांना या प्रकरणाबाबत काही महत्त्वाचे संकेत मिळाले असून पुढील तपास सुरू आहे. एएसआयच्या कुटुंबीयांनी सिंग यांचे कोणाशीही वैयक्तिक वैर नसल्याचे सांगितले. तसेच या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत भगवंत मान सरकारवर टीका केली आहे.