विधानसभा निवडणूक जवळ येताच भाजपमध्ये आंतरिक मतभेद उमटू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री व आमदार के एस ईश्वरप्पा यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना आपण राजकीय संन्यास घेत असल्याचे पत्र पाठविले आहे.
गेल्या 40 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात ते सक्रिय होते.आपल्या पत्रात त्यांनी आपण स्वच्छेने निवडणूक-राजकारणातून निवृत्त होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कोणत्याही मतदार संघातून उमेदवारी देऊ नये. गेली ४० हुन अधिक वर्षाच्या राजकीय जीवनात आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री सारखे गौरवशाली पद दिल्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची त्यांनी आभार मानले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईश्वरआप्पा यांनी घेतलेल्या या भूमिकेचा भारतीय जनता पक्षाला नक्कीच धक्का पोहोचणार असल्याचे मत राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.