प्रतिनिधी /बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव दि. 14 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, भाजी मार्केट, किल्ला परिसर, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, रविवार पेठ, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, कलमठ रोड, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, सांबरा रोड, अमननगर, मध्यवर्ती बसस्थानक, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, आरटीओ सर्कल, कोतवाल गल्ली, खडेबाजार, भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, भोवी गल्ली, माळी गल्ली, कलईगार गल्ली, रिसालदार गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, उज्ज्वलनगर, आमननगर, मारुतीनगर या परिसरात वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.
दक्षिण भागात उद्या भारनियमन
शहराच्या दक्षिण भागात रविवार दि. 12 रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहत, आरपीडी परिसर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा ठप्प असेल. नागरिकांनी हेस्कॉमला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.