दुरुस्तीच्या कारणास्तव सकाळी 9 ते 5 वीज नाही
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव ऑटोनगर परिसरासह विविध भागात मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. केआरडीबी ऑटोनगर, इंडस्ट्रीज एरिया, केएसआयडीबी इंडस्ट्रीज एरिया, सिद्धेश्वर फौंड्रीज, टाटा पावर, आशियान इंडस्ट्रीयल, एक्झिबिशन सेंटर, केएसआरटीसी डेपो, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, यादव इंडस्ट्री, कणबर्गीनगर, केएचबी कॉलनी, आंबेडकर कॉलनी परिसर, साई कॉलनी, सागरनगर, काकती, मुत्यानट्टी, बसवनकोळ्ळ पाणीपुरवठा विभाग, के. रामतीर्थनगर, गणेश सर्कल ते प्रतीक्षा हॉटेल व स्टेट बँक ऑफ म्हैसूर परिसर, शिवालय ते शिवालय मागील भाग, श्रुती लेआऊट, सुरभी हॉटेल, आश्रय कॉलनी, कुलकर्णी लेआऊट, सेक्टर क्रमांक 8, 9, मॅरिएट हॉटेल या भागात विद्युतपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.