प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रविवार दि. 9 रोजी शहरासह तालुक्याच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
शहरातील ऑटोनगर औद्योगिक वसाहत, केएसआरटीसी डेपो, केएचबी कॉलनी, कणबर्गी, आंबेडकर कॉलनी, मुत्यानट्टी, बसवनकोळ, रामतीर्थनगर, आश्रय कॉलनी, कुलकर्णी ले-आऊट, बेळगाव तालुक्यातील मच्छे, झाडशहापूर, हावळनगर, नावगेकरनगर, ओमकारनगर, देसूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, रंगदोळी, पिरनवाडी, खादरवाडी, मार्कंडेयनगर, तीर्थकुंडये, हुंचेनट्टी या भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे.