प्रतिनिधी/ पणजी
11 केव्ही कांदोळी फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 11 जून रोजी सकाळी 6.00 ते 11.30 वाजेपर्यंत कांदोळी, सिकेरी, गौरावाडो, तिवईवाडो, झिमर, उंच प्रदेश, एक्रीवाडो, बामणवाडो, आग्वाद आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
11 केव्ही नेरूल फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 11 जून रोजी सकाळी 6.00 ते 11.30 वाजेपर्यंत फोर्टावाडो, नेरूल, टिंटो वाडो, दानदी, भाटियर, फिरंगेभाट, आंबेखंड, वेरे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे 11 केव्ही बेती फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 11 जून रोजी सकाळी 6.00 ते 11.30 वाजेपर्यंत प्रगती हायस्कूल, वेरे मार्केट, हनुमान मंदिर, खेगडेवेली, नेव्ही जेटी, बेती, नेव्ही कॉम्प्लेक्स, पिळर्ण गांव -मोइकावाडो, नावेती, व्होल्वाडो, मैना, व्हॉलांत फोर्टावाडो, नेरूल, टिंटोवाडो, दानदी, भाटियर, फिरंगेभाट, आंबेखंड, वेरे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
11 केव्ही सीटी आणि बोर्डे फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 11 जून रोजी सकाळी 6.00 ते 12.30 वाजेपर्यंत संपूर्ण डिचोली शहर, मार्केट भागात, मुस्लिमवाडा, पीएचसी पोलीस स्टेशनजवळ, कातरवाडा, वाठादेव, बोर्डे हाऊसिंग बोर्ड, आयटीआय जवळ, बँक ऑफ बडोदा, झांट्यो काजू कारखाना डिचोली, पिळगांव, सप्तकोटेश्वर नार्वा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.