यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा पुरस्कार
ओटवणे प्रतिनिधी
यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या यावर्षीचा फार्मसिस्ट ऑफ द इयर या पुरस्कार गेली ६० वर्षे सचोटीने व्यवसाय करत असलेल्या बांदा येथील पी एम शिरसाट मेडिकलचे मालक प्रभाकर महादेव शिरसाट यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, सौ सावंत भोसले, जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, माजी अध्यक्ष दयानंद उबाळे, भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव संतोष राणे, माजी अध्यक्ष मकरंद कशाळीकर श्रीराम गावडे, प्रसाद सप्ते, सचिन मुळीक, उमेश काळकुंद्रीकर, सौ काळकुंद्रीकर, पिंट्या गायतोंडे, सचिन बागवे आदी उपस्थित होते.
या पुरस्काराचे हे नववे वर्ष असून जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधून या कॉलेज मार्फत दरवर्षी एक जबाबदार फार्मासिस्ट या नात्याने समाजामध्ये विशेष सेवा बजावलेल्या व्यक्तीची निवड करण्यात येते. भोसले नॉलेज सिटीमध्ये बुधवारी जागतिक फार्मासिस्ट दिन सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार करण्यात आला. यावेळी प्रभाकर शिरसाट यांचा मुलगा सुधीर शिरसाट, त्यांच्या स्नुषा सौ रूपाली शिरसाट उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रभाकर शिरसाट यांच्या त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतील औषध व्यवसायाच्या कार्याचा गौरव करून त्यांची ही सेवा आजच्या फार्मासिस्टसाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी प्रभाकर शिरसाट यानी आपण प्रामाणिकपणे केलेल्या व्यवसायाची पोचपावती म्हणजेच आपल्याला मिळालेला हा पुरस्कार आहे. आपल्या या यशामध्ये शिरसाट कुटुंबीय, आपल्याला घडवणारे गुरुजनवर्ग, विश्वासाने जोडला गेलेला प्रत्येक सर्वसामान्य रुग्ण, व्यवसायातील इतर कर्मचारी तसेच रिटेल व होलसेल व्यवसायातील सर्व सहकारी व केमिस्ट संघटना यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.