7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये
अभिनेत्री प्राजक्ता कोळीने प्रियकर वृषांक खनालसोबत साखरपुडा केला आहे. दोघांनीही छायाचित्रे शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे. वृषांक आता माझा प्रियकर नसल्याचे म्हणत प्राजक्ताने स्वत:ची एंगेजमेंट रिंग दर्शविली आहे.
प्राजक्ता आणि वृषांकच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहते तसेच कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ‘नेव्हर हॅव आय एव्हर’ फेम अभिनेत्री मैत्रेयी रामकृष्णन, अनिल कपूर, वरुण धवन, सुनील शेट्टी, भूमी पेडणेकर, अरमान मलिक, बरखा सिंह, भारती सिंह, गौहर खान समवेत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता आणि वृषांक सुमारे 7 वर्षांपासून परस्परांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा परस्परांसोबतची छायाचित्रे शेअर करत राहिले आहेत. प्राजक्ताचा प्रियकर हा वकील असून सध्या दोघेही अमेरिकेत एकत्रित वेळ घालवत आहेत. प्राजक्ता दीर्घकाळापासून युट्यूबवर कंटेंट तयार करत राहिली आहे. 2020 मध्ये नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘मिसमॅच्ड’मध्ये ती झळकली होती. प्राजक्ताने स्वत:चे बॉलिवूड पदार्पण चित्रपट जुग जुग जियोमधून केले होते.