वृत्तसंस्था/ हांगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारातील व्हॉल्ट आणि ऑलराऊंड प्रकारामध्ये भारताची महिला जिम्नॅस्ट प्रणाती नायकने अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
महिलांच्या व्हॉल्ट आणि ऑलराऊंड जिम्नॅस्टिक प्रकारातील अंतिम आघाडीच्या 8 जिम्नॅस्टमध्ये भारताच्या प्रणाती नायकने सहावे स्थान मिळवताना 12.716 गुण नोंदवले. महिलांच्या ऑलराऊंड फायनलमध्ये प्रणाती नायकने अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. ही अंतिम फेरी बुधवारी होत आहे. ऑलराऊंड जिम्नॅस्ट प्रकारात प्रणाती नायकने सर्वंकश स्पर्धकांमध्ये 23 वे स्थान मिळवले आहे. या क्रीडा प्रकारात चीन, जपान, चीन तैपेई, उत्तर कोरिया आणि प्रजासत्ताक कोरिया या देशांचे प्रत्येकी तीन जिम्नॅस्ट फायनल्ससाठी पात्र ठरले आहेत.