राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रवीण कुमार श्रीवास्तव यांनी सोमवारी केंद्रीय दक्षता आयुक्तपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अन्य महनीय उपस्थित होते.
केंद्रीय दक्षता आयोगाचे नेतृत्व केंद्रीय दक्षता आयुक्त करतो आणि यात कमाल दोन दक्षता आयुक्त असू शकतात. आयबीचे माजी प्रमुख अरविंद कुमार हे सध्या एकमात्र दक्षता आयुक्त आहेत. दक्षता आयुक्ताचा कार्यकाळ चार वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंतचा असतो.
श्रीवास्तव हे आसाम-मेघालय कॅडरच्या 1988 तुकडीचे अधिकारी राहिले आहेत. मागील वर्षी 31 जानेवारी रोजी ते कॅबिनेट सचिवालयातून सचिव पदावरून निवृत्त झाले होते. गृह मंत्रालयात विशेष सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून स्वत:च्या कार्यकाळादमयान आयपीएस कॅडरचे व्यवस्थापन, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कर्मचारी तसेच सामान्य प्रशासनाशी संबंधित मुद्दे हाताळले होते.