तरुणभारत ऑनलाइन
अभिनेता प्रवीण तरडे हे नाव सध्या या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील या अभिनेता-दिग्दर्शकाचा बोलबाला आहे.मुळशी पॅटर्न,
‘सरसेनापती हंबीरराव’ आणि धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे अशा त्यांचा सुपरहिट चित्रपटांमुले अभिनय क्षेत्रात एक वेगळीच छाप उमटली आहे.‘सरसेनापती हंबीरराव’ आणि धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या दोन्ही चित्रपटांनी देखील चांगलीच कमाई केली आहे.याच चित्रपटांसाठी प्रवीण तरडे यांना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतंच त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
नुकतंच तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.शाहीर दादा कोंडके पुरस्कार २०२२ – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. यंदाचा हा मानाचा पुरस्कार सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी मिळला. या दोन्ही सिनेमांसाठी अहोरात्र झटलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे.