तर सावंतवाडी तालुका सेक्रेटरीपदी जावेद खान यांची निवड
ओटवणे : प्रतिनिधी
केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी ओटवणे येथील प्रविण सखाराम कवठणकर यांची तर सावंतवाडी तालुका सेक्रेटरीपदी सावंतवाडी शहरातील जावेद दाऊद खान यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ मिलींद दहीवले यांनी ही निवड केली आहे.
प्रविण कवठणकर गेल्या १० वर्षांपासून केंद्रीय मानव मानवाधिकार संघटनेत कार्यरत असून त्यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा सहसचिव त्यानंतर सचिव या पदावर काम केले आहे. तसेच या संघटनेच्या दैनिक आणि साप्ताहिकाचे ते पत्रकार असून अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माधवा मानवाधिकार संघटनेच्या गोवा राज्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी याबाबतचे नियुक्तीपत्र प्रविण कवठणकर आणि जावेद खान यांना डॉ मिलिंद दहिवले यांनी प्रदान केले. यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे गोवा राज्य उपाध्यक्ष सुरज बेहेरे, महिला उपाध्यक्ष सिमा बेहेरे, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अजित सुभेदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.