असह्या उकाड्यापासून सुटका : गटारे तुंबल्याने वाहतुकीत अडथळा
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा तालुक्यातील विविध भागांमध्ये शुक्रवारी रात्री व शनिवारी मोन्सनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने मागील काही दिवसांपासून असह्dया उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मोन्सूनच्या पावसाला झालेला विलंब व वळीवाच्या सरींचाही मागमूस नसल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाच्या झळा अधिकच कडक जाणवल्या. फोंडा शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात हा पाऊस कोसळला. बऱ्याच प्रतिक्षेनंतर झालेल्या पावसाच्या आगमनामुळे हवामानात गारवा निर्माण झाला.
तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ओपा प्रकल्पाला पाणी पुरवठा करणारे खांडेपार नदीवरील सर्व बंधारे पावसाच्या विलंबामुळे कोरडे पडले होते. हा पाऊस येथील जलस्रोतांना पुन्हा जीवंत करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे वैराण झालेली रानेवने व एकुणच जीवसृष्टी पावसाच्या या आगमनामुळे ताजीतवानी झाली आहे.
गटारे तुंबल्याने रस्ते पाण्याखाली
शनिवारी कोसळलेल्या या पावसामुळे जनतेला विसावा मिळाला. मात्र शहरातील तुंबलेल्या गटारांमुळे ठिकठाकणी पाणी रस्त्यावर आले. जुन्या बसस्थानकावरील कवळेकर पेट्रोल पंपजवळील रस्ता पाण्याखाली गेला. वरचा बाजार येथील मार्केट प्रकल्पच्या खुल्या जागेत पाण्याच्या निचऱ्यासाठी कुठलीच सोय नसल्याने पावसाचे पाणी थेट मासळी मार्केटमध्ये घुसले. मार्केटच्या प्रवेशद्वारात पाण्याचा तलाव निर्माण झाल्याने काही मासे विक्रेत्या महिलांची धावपळ उडाली. फोंडा शहर व आसपासच्या पंचायत क्षेत्रामध्ये सध्या अंडरग्राऊड वीज वाहिन्यासाठी खोदकाम सुऊ आहे. त्यामुळे गटार व्यवस्था मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने पाण्याची वाट बंद झाली आहे. वाहनचालकांची त्यामुळे प्रचंड हाल होणार आहेत. तालुक्यातील बऱ्याच पंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी गटारे उपसण्याचे काम अद्याप झालेले नाही. शनिवारच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावऊन वाहत होते.