प्रथम एकल कथ्थक नृत्याचे सादरीकरण : संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
प्रथम एकल कथक नृत्य सादरीकरणाच्या वतीने कु. प्रीती रमेश शिरोलीकर हिच्या नृत्यांजली कार्यक्रमाचे रविवारी (3 जुलै) सकाळी 10 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजन केले आहे. प्रीती शिरोलीकर ही कोथरूड पुणे येथील सृष्टी कथ्थक केंद्राच्या गुरूवर्य अलकाताई रहाळकर व डॉ. आसावरीताई रहाळकर यांची शिष्या आहे. या दोघींच्या मार्गदर्शनाखाली प्रीतीने कथ्थकचे धडे घेतले आहेत. बाळासाहेब वासुदेव शिरोलीकर, सुलभा शिरोलीकर आणि महादेव देशपांडे यांच्या प्रोत्साहनाने प्रीती प्रथमच संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात नृत्याविष्कार सादर करणार आहे. नृत्यरसिकांसाठी या कार्यक्रमात मुक्त प्रवेश आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रीतीचे वडील आणि आई रमेश व वीणा शिरोलीकर यांनी केले आहे