अंत्यविधी शेडचे बदलले पत्रे ; आमदारांकडून शवदाहिनीची पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यविधी शेडचे पत्रे पूर्णपणे खराब झाले होते. सदर पत्रे बदलण्याची सूचना मनपा अधिकाऱयांना करण्यात आली होती. याची दखल घेऊन आठवडय़ात हे पत्रे बदलण्यात आल्याने या कामाची पाहणी आमदार अनिल बेनके यांनी केली. तसेच डिझेल शवदाहिनीचे परिवर्तन करण्याची तयारी मेघागॅस कंपनीने दर्शविली असून, हे काम दि. 15 मे पर्यंत पूर्ण करण्याची सूचना आमदारांनी केली.
स्मशानभूमीतील अंत्यविधी शेडचे पत्रे खराब झाल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच या ठिकाणी असलेल्या डिझेल शवदाहिनीची पाहणी करून गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये परिवर्तन करण्याची सूचना महापालिका अभियंत्यांना केली होती. याची दखल घेऊन अंत्यविधी शेडचे पत्रे बदलले आहेत. त्याचप्रमाणे डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीचे परिवर्तन करण्याची तयारी मेघागॅस कंपनीने दर्शविली आहे. मेघागॅस कंपनीच्या अधिकाऱयांनी पाहणी करून अहवाल तयार केला होता.
बुधवारी आमदारांच्या पाहणी दौऱयावेळी शवदाहिनीच्या दुरुस्तीची माहिती मेघागॅसच्या अधिकाऱयांनी दिली. गॅस दाहिनीचे परिवर्तन करून मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. पण 15 मे पर्यंत हे काम पूर्ण करा, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. तसेच स्मशानभूमीतील समस्यांचे निवारण करण्याची सूचना अधिकाऱयांना केली. यावेळी महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे, मेघागॅस कंपनीचे अधिकारी मयुर हिरेमठ आदिंसह अधिकारी उपस्थित होते.