जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील स्वच्छतेला प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
15 ऑगस्ट स्वातंत्र्योत्सवासाठी जय्यत तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पूर्वतयारी बैठकीत केली आहे. याची दखल घेऊन मनपाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील स्वच्छता कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टसाठी आवश्यक ती तयारी करण्याची सूचना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तयारीला गती देण्यात आली आहे. प्रामुख्याने सरकारी कार्यालयांच्या परिसरात असणाऱ्या स्वच्छता कामाला चालना देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असणाऱ्या भुयारी मार्गावरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत व कचरा साचला होता. याची स्वच्छता करण्यात आली. याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता कामे राबविण्यात येत आहेत.
पेव्हर्स बसविणे, ख•s बुजविणे, परिसरातील उद्यानामध्ये वाढलेली खुरटी झुडुपे, कचरा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.