मालवण: प्रतिनिधी
सिंधुरत्न कलावंत मंचच्या वतीने संगीत, नाट्य ,चित्रपट तसेच सामाजिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कोकणातील व्यक्तींसाठी दिला जाणारा कोकणरत्न पुरस्कार वेदांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भंडारी संघाचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर यांना प्रदान करण्यात आला असून हा पुरस्कार मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात सिंधुदुर्ग कलावंत मंचचे अध्यक्ष आणि चित्र नाट्य अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सिंधुरत्न कलावंत मंच ही संगीत नाट्य , चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलावंत आणि तंत्रज्ञानी स्थापन केलेली संस्था आहे. कोकणातील अनेक कलावंत- तंत्रज्ञ मराठी-हिंदी संगीत,नाट्य, चित्रपट व्यवसायात कार्यरत आहेत. स्थानिक तरुणांना मुख्य प्रवाहात आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा संस्थेचा उद्देश आहे. संस्थेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून संगीत,नाट्य,चित्रपट तसेच सामाजिक,शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कोकणातील व्यक्तींचा सन्मान कोकनरत्न पुरस्कार देऊन केला जातो
यावर्षी हा पुरस्कार मालवणचे सुपुत्र तसेच वेदांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भंडारी संघ मुंबईचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर यांना प्रदान करण्यात आला कोरोना काळात वेदांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गुरुनाथ मीठबावकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
यावेळी बोलताना सत्कारमूर्ती श्री मिठबावकर यांनी सिधुरत्न कलावंत मंचतफेँ कोकणरत्न पुरस्कार -2023 हा माझ्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार दिल्याबद्दल सिधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष व अभिनेता विजय पाटकर यांचे आभारी आहे. तसेच कोकणातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कोकणात स्टुडीओ उभारणी साठी आपले सहाय्य राहील अशी ग्वाही दिली.