वेंगुर्ले – सोलापूर सूर्यप्रभा येथे नुकत्याच पार पडलेल्या डिस्टिक एम एच टू दिव्यध्वनी येथील मिटमध्ये लिनेस क्लब ऑफ वेंगुर्लेच्या प्रेसिडेंट लिनेस उर्मिला सावंत यांना बेस्ट प्रेसिडेंट व ट्रेझरर कविता जयंत भाटिया यांना बेस्ट ट्रेझरर इन डिस्ट्रिक्ट अशी अवार्ड मिळाली. तसेच मनोरंजन व स्पर्धा यात वेंगुर्ले लिनेस क्लबने सादर केलेल्या मालवणी गजाली' या नाटिकेला दुसरा क्रमांक मिळाला. ऑल इंडिया क्लब मल्टी चतुर्भुजा डिस्टिक एम.एच.टू दिव्य ध्वनी लिनेस क्लबची मिट सूर्यप्रभा सोलापूर येथे नुकतीच संपन्न झाली. एम.एच. टू दिव्यध्वनी या डिस्ट्रिक्टच्या प्रेसिडेंट अंजू मालू यांच्या अध्यक्षतेखाली हि मिट संपन्न झाली. यावेळी मल्टिपल चतुर्भुजा प्रेसिडेंट लिनेस वर्षा जवेरी यांच्या हस्ते लिनेस क्लब ऑफ वेंगुर्लेच्या प्रेसिडेंट लिनेस उर्मिला सावंत यांना बेस्ट प्रेसिडेंट व ट्रेझरर काfवता जयंत भाटिया यांना बेस्ट ट्रेझरर इन डिस्ट्रिक्ट अशी अवार्ड मिळाली. तसेच मनोरंजन व स्पर्धा यात वेंगुर्ले लिनेस क्लबने सादर केलेल्या
मालवणी गजाली’ या नाटिकेला दुसरा क्रमांक मिळाला. यात सहभागी दिग्दर्शक लिनेस अBड. सुषमा प्रभू-खानोलकर, प्राची मणचेकर, हेमा गावस्कर, नीला यरनाळकर, अंजली धुरी, उर्मिला सावंत यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास सेक्रेटरी लिनेस शर्मिला मठकर, अश्विनी गावस्कर, मंदाकिनी सामंत उपस्थित व सहभागी होत्या.
Previous Articleसिनेटसाठी मतदान सुरु; आ. हसन मुश्रीफांनी केलं मतदान
Next Article राज ठाकरेंचा कोकण दौरा जाहीर
Related Posts
Add A Comment