वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 22 जून रोजी अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान मोदींना अधिकृत दौऱ्यासाठी आमंत्रित केले आहे.
युनायटेड स्टेट्स हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि युनायटेड स्टेट्स सिनेटकडून शुक्रवारी संयुक्त बैठकीसंबंधी माहिती देण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील भागीदारी सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या संसदेत भारताच्या भविष्यासाठी स्वत:चा दृष्टीकोन आणि दोन्ही देशांसमोर असणाऱ्या जागतिक आव्हानांवर स्वत:ची भूमिका मांडतील असे म्हटले गेले.