बेळगाव : रोटॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित विजेता स्पोर्टस् क्लब पुरस्कृत हिंडलगा हाफ मॅरेथॉन स्पर्धेत प्रीतम कुबेर, भैरू नाईक, प्रतीक्षा, कुबेर, नकाशा मंगनाळकर, वेदांत होसूरकर, शीतल सिकंदर, शुभांगी काकतकर, कीर्ती वेताळ, वयस्कर गटात चंद्रकांत कडोलकर यांनी विजेतेपद पटकाविले. हिंडलगा येथे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन विजेता स्पोर्टस् क्लबचे संचालक कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी ध्वज उंचावून स्पर्धेचे उद्घाटन केले. पाच किलोमीटर व दहा किलोमीटर अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 16 वर्षांखालील मुलामुंलीसाठी व खुल्या गटासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : 16 वर्षांखालील मुले-मुली गट, 10 किलोमीटर धावणे 1) प्रीतम कुबेर 2) श्रीशद भातकांडे 3) अथर्व सुळगेकर, मुले- 16 वर्षांवरील मुले 1) भैरू नाईक 2) ध्रुव पांडे 3) सौरभ पाटील, मुलींचा विभाग 16 वर्षांआतील 1) प्रतीक्षा कुबेर 2) प्रांजल शिंदे, 16 वर्षांवरील गट नकाशा मंगनाळकर यांनी विजेतेपद पटकाविले. 16 वर्षांखालील 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांच्या गटात 1) वेदांत होसूरकर 2) अनिकेत किणेकर 3) सौरव पाटक, 16 वर्षांवरील गट 1) शीतल सिकंदर 2) सुरज भालेकर 3) हनुमंत. मुलींच्या विभाग 1) शुभांगी काकतकर 2) धनश्री 3) राजश्री भडाचे, 16 वर्षांवरील गट 1) क्रांती वेताळ 2) पूजा हलगेकर 3) सौंदर्या हलगेकर यांनी विजेतेपद पटकाविले. 50 वर्षांवरील पुरूष गटात 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत 1) चंद्रकांत कडोलकर 2) व्यंकटेश जवळी 3) अरविंद कापाडिया यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना कर्नल मोहन नाईक, ए. बी. शिंत्रे, नागेश मडिवाळ, अरुण नाईक, संतोष सुतार, रामचंद्र कुद्रेमणी, पुरस्कर्ते चंद्रकांत कडोलकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांत पदके, प्रमाणपत्र, रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हिंडलगाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.