कोल्हापूर : कोरोना काळात मृत्यू झालेल्या किंवा अकाली निधन झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने कोल्हापूरच्या प्रिया पाटील (Priya Patil) हिने धाडस दाखवून अनेक मृतांवर अंत्यसंस्कार केले होते. त्याची दखल घेत राज्य सरकारने प्रिया पाटीलच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबवले जाणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये युवकांना सहभागी करण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची राष्ट्रीय सेवा योजनेची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून प्रिया पाटील यांची विना मानधन तत्वावर नियुक्ती केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज काढण्यात आला.
अधिक वाचा : नौदलात उद्या दाखल होणार INS मुरमुगाव
कोल्हापूरची प्रिया बनली महाराष्ट्राची ब्रँड ॲम्बेसिडर
कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची शासन स्तरावर नोंद घेऊन भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात सुरू असलेल्या शववाहीकेवर चालक म्हणून प्रिया पाटील हिने काम केले होते. कोरोना काळात साधारण पाचशे ते साडेपाचशे मृतदेहावर अंत्यसंस्काराचे काम हर्षल सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रियाने काम केले. या कामासाठी तिला प्रियाचे वडील प्रकाश पाटील व आई मनिषा पाटील यांची पाठबळ लाभले.