प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने घेण्यात आलेल्या सुंदर सार्वजनिक गणेशमूर्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी करण्यात आले. कपिलेश्वर चौक येथील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात हा कार्यक्रम पार पडला. शिवसेनेच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱयांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
उत्तर विभाग- प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कपिलेश्वर चौक, द्वितीय कंग्राळ गल्ली गणेशोत्सव मंडळ, तृतीय सम्राट अशोक चौक गणेशोत्सव मंडळ, चतुर्थ शनिवार खुट गणेशोत्सव मंडळ, पाचवा कडोलकर गल्ली गणेशोत्सव मंडळ,
दक्षिण विभाग- प्रथम राजहंस गल्ली अनगोळ गणेशोत्सव मंडळ, द्वितीय वझे गल्ली वडगाव गणेशोत्सव मंडळ, तृतीय कारभार गल्ली वडगाव गणेशोत्सव मंडळ, चतुर्थ खासबाग संभाजी रोड गणेशोत्सव मंडळ, पाचवा सराफ कट्टा शहापूर गणेशोत्सव मंडळाने पटकाविला. दोन्ही विभागात विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर उपप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम यांच्या हस्ते मानचिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी महेश टंकसाळी, राजू कणेरी, प्रकाश हेब्बाजी, निरंजन अष्टेकर, प्रदीप सुतार, विजय मुरकुटे, बाळासाहेब डंगर्ले, मयुरेश काकतकर, लक्ष्मण चतूर व इतर उपस्थित होते.