प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव, बायजुस सेंटर व आयुष क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण 25 शाळांच्या 780 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. जैन हेरिटेज शाळेत श्रद्धा काथवटे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून वेणू गोसावी व डॉ. राधिका कुलकर्णी उपस्थित होत्या.
पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर कसे सुधारता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित बायजुसचे प्रीतम पाटील यांनी गुणात्मक शिक्षणाबद्दल विचार व्यक्त केले. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर, इव्हेंट चेअरमन स्नेहा पंडित उपस्थित होते.
पहिल्या तीन क्रमांकांसह प्रत्येक विभागातील 15 जणांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत सर्वसाधारण अजिंक्मयपद सेंट पॉल्स शाळेने पटकाविले. आयुष क्लिनिकने ते पुरस्कृत केले होते.