हैद्राबाद : तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस)(TRS) ४ आमदारांना भारतीय जनता पक्षात (BJP) आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चौकशी तेलंगाणा पोलीसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) सुरू केली असून एसआयटीने या प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या संशयितांना लुकआउट नोटीस जारी केली आहे.
सोमवारी, तेलंगाणा पोलिसांनी एर्नाकुलममधील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डॉक्टर कोट्टील नारायण जग्गू उर्फ जग्गू स्वामी यांना लुकआउट नोटीस जारी केली आहे. एसआयटीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि केरळमधील भारत धार्मिक जनसेनेचे संस्थापक अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांनासुद्धा नोटीस जारी होणार आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणातील चौकशीसाठी या सर्वांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणे बंघनकारक आहे.
“करीमनगर येथील वकील बी. श्रीनिवास हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांचे जवळचे सहकारी असून तेही एसआयटीसमोर हजर झाले. सुमारे आठ तासाच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले असून मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी त्याची चौकशी करण्यात येणार आहे.” या संबंधित माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.