नवी दिल्ली
सरकारी मालकीची मिनी रत्न कंपनी एनएचपीसीने मार्च तिमाहीत नफ्यात प्रचंड वाढ केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 39 टक्क्यांनी वाढून तो 719 कोटी रुपयावर पोहोचला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 1.85 रुपये लाभांश जाहीर केला आहे.
नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनएचपीसीने मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत नियामक फाइलिंगमध्ये, कंपनीने मार्च 2022-23 च्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 39.40 टक्के वाढ नोंदवली असून ती 719.18 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 515.90 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये स्टँडअलोन आधारावर 3834 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, तर मागील आर्थिक वर्षात कंपनीने 3538 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.