फिनटेकमुळे नफा तेजीत असल्याचा बँकांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण नफा प्रथमच 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊन 1,04,649 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 2017-18 मध्ये या बँकांना 85 हजार कोटींचा तोटा झाला होता. क्रिसिल रेटिंग एजन्सीचे वरिष्ठ संचालक अरुण कुमार अय्यर म्हणाले, ‘बँकांनी फिनटेक कंपन्यांना व्यवसाय भागीदार बनवले आहे. यामुळे बँकेच्या बाहेर ठेवी, पैसे काढणे आणि निधी हस्तांतरण यांसारखी कामे होऊ लागली आहेत. हे सर्व व्यवहार बँकेच्या शाखा किंवा एटीएममधून झाले तर बँकांचा खर्च वाढेल असेही ते म्हणाले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी सीएमडी एम नरेंद्र म्हणाले की, फिनटेकने छोट्या कर्जावरील बँकांच्या खर्चात बचत केली. नवीन खाती उघडण्यातही ते उपयुक्त ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बहुतेक सरकारी बँका तोट्यातून नफ्यात
बँक 2022-23 2017-18
स्टेट बँक ऑफ इंडिया 50,232 -6,547
बँक ऑफ बडोदा 14,110 2,432
पंजाब नॅशनल बँक 2,507 -12,283
युनियन बँक 8,433 -5,247
इंडियन बँक 5,282 1,259
इंडियन ओव्हरसीज बँक 2,099 -6,300
टी रुपयात आकडे, स्रोत: बँकांचे निकाल
युपीआय व्यवहारातून बचत
2022-23 मध्ये युपीआयद्वारे 83.71 अब्ज व्यवहार झाले. तीन वर्षांत त्यात 4 पट वाढ झाली आहे. प्रत्येक शाखेच्या व्यवहाराची किंमत 24 रुपये, एटीएम व्यवहाराची किंमत 15-18 रुपये आणि पीओएस कार्ड स्वॅपची किंमत 3-5 रुपये आहे. फिनटेकद्वारे व्यवहार खर्च वाचवला जात आहे.
फिनटेकने आपली व्याप्ती वाढवली आहे
आनंद बजाज म्हणतात की 7.25 लाख गावांसाठी फक्त 25,000 बँक शाखा आहेत. फिनटेक गावांना आर्थिक सेवांशी जोडते. अशा प्लॅटफॉर्मवरून 50 टक्के व्यवहार बँकांमध्ये जातात. ते कर्ज देत नाहीत आणि ठेवी घेत नाहीत.