पुणे / प्रतिनिधी :
निवडणूक आयोगाच्या शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाविरोधात रविवारी आंदोलन केले.
या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात ठाकरे गटाचे शिवसैनिक सहभागी झाले होते. ‘होय, आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंसोबत, भलेही धनुष्य हिरावून घ्याल, पण मनुष्य आजही मातोश्री सोबत’ हा फलक घेऊन शिवसैनिक सहभागी झाले होते. हा फलक नागरिकांच लक्ष वेधून घेत होता.
अधिक वाचा : पुण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा
राज्यातील सर्व जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत : संजय मोरे
या वेळी ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, केंद्र सरकारच्या दबावाखाली सर्व यंत्रणा काम करीत असून, कालचादेखील तसाच निर्णय घेतला आहे. आमचा धनुष्यबाण 40 चोरांनी घेतला असला, तरी राज्यातील सर्व जनता आणि आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. एवढेच या सर्व गद्दारांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात शिंदे गटावर त्यांनी निशाणा साधला.