रत्नागिरी प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत.
मंगळवार 30 मे 2023 रोजी सकाळी 10.30 ते 11 मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 कि.मी. ची पाहणी करणार आहेत . सकाळी 11 ते 12 मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी. दुपारी 12 ते 1 मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 1ते 2 मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी करणार आहेत. दुपारी 2 ते 3 चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे असणार आहेत. दुपारी ३ ते 3.30 ते मुंबई-गोवा महामार्ग चिपळूण ते परशुराम घाट या 11.40 कि.मी. ची पाहणी. 3.30 ते 4.15 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 4 परशुराम घाट ते कशेडी घाट या 42.30 किमी ची पाहणी. 4.15 ते ५ वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द या 13 किमी ची पाहणी करणार आहेत.