वेंगुर्ल्यात झाले प्रकाशन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारच्या माध्यमातून आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेणारी पुस्तिका आज गुरुवारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वेंगुर्ले येथे प्रकाशित करण्यात आली.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आपल्या वेंगुर्ले- भटवाडी येथील निवासस्थानी गणेश दर्शनाला आलेले होते. याचे औचित्य साधून शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात व राज्यात विविधांगी स्वरूपाच्या केलेल्या विकास कामांचे छायाचित्रासह कोट्यवधी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या कामांची माहिती देणारी परिपूर्ण अशी पुस्तिका गणेशोत्सवात प्रत्येक नागरिकांच्या माहितीसाठी देण्यात येणार आहे.
या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थितात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना वेंगुर्ले प्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ले शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम,वेंगुर्ले तालुका समन्वयक बाळा दळवी, अमित परब यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.