सावंतवाडी राजवाड्यात राजघराण्याच्या हस्ते प्रकाशित
सावंतवाडी : प्रतिनिधी
नवसाहित्यिक तथा विद्यार्थिनी अक्षदा अजित गावडे रा.आरोस गिरोबावाडी हिचा आज पहिलाच “क्षणिक” हा काव्यसंग्रह राजवाडा येथे श्रीमंत खेमसावंत ,राणी शुभदादेवी, लखम युवराज भोसले,यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला.अक्षदा सध्या अकरावी सायन्स नवोदय विद्यालय सांगेली येथे शिक्षण घेत आहे. नवोदय विद्यालयामध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणून नेहमीच तिला गौरवण्यात येते. तिला पुढे खूप शिकून कलेक्टर होण्याची इच्छा आहे. त्या पद्धतीने तिची वाटचाल सुरू आहे. अक्षदाला लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. तिने अनेक लेखकांचे पुस्तके वाचली आणि त्यातूनच आज हा काव्यसंग्रह त्यांच्या आई वडिलांच्या व त्यांच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाने आपल्यासमोर आला .
क्षणिक हा काव्यसंग्रह तिच्याकडून लिखित होऊन आज प्रकाशित होताना तिला व तिच्या कुटुंबाला खूप आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांनी केले. याप्रसंगी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अक्षदाचे कौतुक करून या जिल्ह्याची कलेक्टर व्हावी याकरिता अक्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमंत बाळराजे यांनीही तिचं कौतुक करून पुस्तक काव्यसंग्रह प्रकाशित साठी राजदरबार उपलब्ध करून दिला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी याकरिता राजघराण्याचे सहकार्य कायम लाभेल अशीही ग्वाही दिली. प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमेश कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते भाई पावसकर ,डॉक्टर देसाई, भालचंद्र गावडे, अजित गावडे, वैदेही गावडे, अंकिता गावडे, सुंदर गावडे, वकिल श्याम सावंत, ज्येष्ठ पत्रकार व मराठा संघाचे अध्यक्ष सिताराम गावडे, प्रविण मांजरेकर, अभिमन्यू लोंढे, पत्रकार देसाई, अनिल भिसे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव , बंडु सावंत, सुभाष गावडे त्यांनीही अक्षदाला हीच अभिनंदन करून तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.