नवी दिल्ली
फॅशन उद्योगात असणाऱ्या आदित्य बिर्ला फॅशन रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल) यांनी टीसीएनएसमध्ये 51 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी केली असल्याची माहिती आहे. टीसेएनएस क्लोथिंग ही महिलांची ब्रँडेड अॅपारल कंपनी आहे. अलीकडेच यासंबंधीची अधिकृत घोषणा बिर्ला समूहाकडून करण्यात आली असून 51 टक्के अधिग्रहण पूर्ण झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. 1650 कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.