सौरभ मुजुमदार,कोल्हापूर
पक्ष्यांबाबत जागरूकतेसाठी राज्य शासनाने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर राज्यपक्षी सप्ताह म्हणून घोषित केला. नेमके याच कालावधीत म्हणजेच ऑक्टोबर महिन्य्रापासून परदेशातून लाखो पक्षी भारतामध्ये स्थलांतर करून येत असतात. वन अधिकारी व नंतरही जंगल भटकंतीची 65 वर्षे वन्यजीव अभ्यासक व लेखक मारुती चितमपल्ली यांचा जन्म दिवस तर 12 नोव्हेंबर हा बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून जगभरात ओळखले जाणारे पद्मविभूषण आणि पद्मभूषण डॉ सलीम अली यांचा जन्मदिन. त्यांच्या कार्याचा गौरवही यानिमित्ताने होत आहे.
रंकाळा, कळंबा, वडगाव, वडणगे व राजाराम तलावांसह विविध ठिकाणी तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. गवताळ प्रदेश, खुरटी झाडे झुडपे या भागातही येणारे पक्षी विभिन्न असून मसाई पठार, सादळे मादळे, गिरावट परिसर सह विविध माळरान परिसरात असे पक्षी आलेले आपणास दिसतीलच. यात मॉन्टेग्यु हरीहर, पाईड हरीहर, लार्कस्, वार्बलरस्, युरोपियन रोलर इ माळरानावरील पक्ष्यांचा समावेश असतो.