2 उपाध्यक्षांसमवेत 3 सचिवांची निवड
वृत्तसंस्था/ इंदोर
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांची स्वत:चे नवे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. इंदोरमध्ये झालेल्या दोन दिवसीय बैठकीत बोर्डाच्या अध्यक्षांसोबत उपाध्यक्ष, महासचिव आणि सचिवांची निवड झाले आहे. जमात ए इस्लामीचे अमीर सअदतुल्लाह हुसैनी हे नवे उपाध्यक्ष झाले आहेत. मौलाना फजलूर्रहीम मुजद्दीदी नवे महासाचिव तर मौलाना यासीन अली उस्मानी, बिलाल हसनी नदवी आणि शाह फैसल अली रहमानी हे नवे सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत.
नव्याने निवडण्यात आलेल्या उपाध्यक्षांसोबत मौलाना अरशद मदनी तसेच मौलाना उमरी हे पूर्वीपासून बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. याचबरोबर डॉ. कासिम रसूली इलियास बोर्डाचे नवे प्रवक्ते असतील. बोर्डाचे नवे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह हे पूर्वी बोर्डाचे महासचिव होते. यामुळे रिक्त पदावर मुजद्दीदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे.