150 ग्रॅम सोने, एक कारसह दुचाकी जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
धारवाड, हुबळी, संकेश्वरसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, गडहिंग्लज परिसरात धुमाकूळ घातलेल्या दोघा चोरटय़ांना हुबळी येथील गोकुळनगर रेल्वे पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 150
ग्रॅम सोन्याचे दागिने, एक कार आणि एक दुचाकी जप्त केली आहे.
या दोघा चोरटय़ांनी पाच ठिकाणी चोरी केली होती. चोरी करण्यासाठी बेळगाव येथील टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतून दुचाकी चोरली होती. त्यानंतर या चोरटय़ांनी हुबळी, धारवाड, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि संकेश्वर येथे चोऱया केल्या होत्या. याची माहिती हुबळी येथील गोकुळनगर रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांना मिळाली.
त्यांच्या नेतृत्वाखालील पीएसआय विश्वनाथ एम. ए., प्रशिक्षणार्थी पीएसआय मंजुनाथ एम. पी., पोलीस हवालदार एन. आर. निलगार, आर. आर. हुकनदवर, बी. एफ. बेळगावी, जी. एस. मत्तीगट्टी, एल. व्ही. नायक. के. एस. गौरी, एम. एम. हिरेमठ, नागभूषण पुजार, महेश बेन्नूर यांनी ही कारवाई केली आहे.