बुधवारी दीड इंच पावसाची नेंद :काणकोणात सर्वाधिक 3.50 इंच पाऊस
पणजी : ऐन गणेश चतुर्थी उत्सव काळात पावसाने मंगळवारी व बुधवारी झोडपून काढले. बुधवारी सरासरी दीड इंच एवढी पावसाची नेंद झाली. तर सर्वाधिक 3.50 इंच पावसाची नोंद काणकोणात झाली. मात्र आज पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. गणेश चतुर्थी उत्सवात काणकोणवासियांच्या उत्साहावर पावसाने विरजण घातले. इतर भागातही सर्वत्र जोरदार पाऊस पडला. परंतु अधूनमधून विश्रांती घेत पाऊस पडला. तर काणकोणमध्ये संततधार पाऊस कोसळला. ऐन चतुर्थी उत्सव काळात गेव्यात जोरदार पाऊस कोसळणार, असे भाकीत यापूर्वी करण्यात आले होते. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. बुधवारीदेखील राज्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. काणकोण 3.50 इंच फोडा 1.50 इंच. केपे, सांखळी 1.25 इंच, मुरगाव, मडगाव 1.25 इंच, सांगे पाऊण इंच, जुनेगोवे व पणजी प्रत्येकी अर्धा इंच. दरम्यान, आज गोव्यात पाऊस थोडी विश्रांती घेईल. मात्र अधून मधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.