Rajaram Sugar Factory Election : महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार आहेत. निकाल सांगण्याची गरज नाही. छत्रपती राजाराम कारखान्यात निवडणूक आम्हीच जिंकणार. संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. याठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
पहा LIVE : संस्था गटाचे उमेदवार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले मतदान
महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते,आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असत धर की पकड , स्वारी घाल की लगेच चितपट कर. माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय आधीच निश्चित आहे.छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत.जित आमचीच होणार असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर शहरातील दोन केंद्रांवर मतदान होत आहे. संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.