हुमा कुरैशी अन् राधिका आपटेसोबत झळकणार
बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार राव, राधिका आपटे, हुमा कुरैशी यांची मुख्य भूमिका असणारा चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट एक सायकोलॉजिकल थ्रिलर स्वरुपाचा आहे. या चित्रपटात आकांक्षा रंजन आणि सिकंदर खेर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील.
या क्राइम कॉमेडी थ्रिलर चित्रपटाची कहाणी वासन बाला यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु चालू महिन्यातच तो प्रेक्षकांना पहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटाची निर्मिती माचिस शॉट्स या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. राजकुमार रावने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील सर्व कलाकारांचा फर्स्ट लुक जारी केला होता.