विकासासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन
खानापूर : असोगा येथील पुरातन श्री रामलिंग देवस्थानच्या नव्याने निवड झालेल्या विश्वस्त कमिटीने कर्नाटक धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची कणेरीमठावर भेट घेऊन श्री रामलिंग देवस्थानच्या विकासासाठी निधी मंजूर करावा, तसेच असोगा हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, देवस्थान परिसरात कल्याण मंडप, यात्री निवास, घाट बांधकाम यासह मंदिराच्या परिसरातील इतर विकासकामासाठी धर्मादाय खात्याने असोगा रामलिंग देवस्थानसाठी आराखडा तयार करून निधी मंजूर करावा, अशी मागणी केली. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपण अधिकाऱ्यांसह असोगा येथील रामलिंग मंदिरास भेट देऊन विचारविनिमय करू, असे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष सोमाण्णा मोरे, खजिनदार संदीप पाटील, सेक्रेटरी विरेंद्र मिसाळ, बसाप्पा रामा पुजारी, अॅड. चेतन मणेरीकर, भिकाजी मादार, विजय होळणकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.