प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीशकुमार यांची गुलबर्ग्याला बदली झाली असून त्यांच्या जाग्यावर रमण गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली आहे. सुमारे 50 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये काही जणांना बढतीही मिळाली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी अखेरपर्यंत शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. स्थानिक व तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार असून निवडणुकीच्या काळात अनेकांना बाहेर जावे लागणार आहे.