ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालिसा पठणच्या मुद्द्यावर चर्चेत आलेल्या अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (ravi rana) आणि खासदार नवनीत राणा (navneet rana) यांना शक्ति प्रदर्शन करणं भोवलं आहे. ३६ दिवसानंतर अमरावतीत परतल्यानंतर राणा दाम्पत्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रात्री १० नंतर लाउडस्पीकर लावल्या प्रकरणी राणा दाम्पत्यासह त्यांच्या १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३६ दिवसांनंतर काल राणा दाम्पत्य काल आमरावतीमध्ये परतल्यावर युवा स्वाभिमानकडून त्यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले होते, हनुमान चालिसाचे पठण देखील करण्यात आले, त्यावेळी लाऊडस्पीकर चालू होते. यावेळी अमरावतीत पोहचल्यानंतर राणा दाम्पत्यांनी शक्तिप्रदर्शन करत लाऊड स्पीकरचा वापर करत नियमांचे उल्लंघन केलं होतं. रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वापरण्यात आले होते. त्यामुळे नियमाचा भंग केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर अमरावती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी पून्हा वाढल्या आहेत.