प्रतिनिधी /मडगाव
वर्ष पध्दती प्रमाणे श्रीक्षेत्र फातोर्डा येथील दामोदर देवस्थान (लींग) येथे वार्षिक भजनी सप्ताह व श्रावणी सोमवार उत्सवानिमित्त 22 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. स्वराभिषेक मडगाव निर्मित ‘रंग मराठी स्वरांचे’ ही भाव, भक्ती, नाटय़ व चित्रपटगीतांची बहारदार मैफल आयोजित करण्यात आली आहे.
यात सहभागी प्रसिद्ध गायक प्रसन्न प्रभू तेडोंलकर (झी मराठी सारेगमप फेम कलाकार) व गायिका नेहा कळसुलकर (कोकणची महागायिका पुरस्कार विजेती कलाकार) सहभागी होतील. त्यांना विष्णू शिरोडकर (सिंथेसाइझर), यतीन तळावलीकर (तबला। धनराज मडकईकर (संवादिनी), किशोर तेली (पखवाज) सुमूख केणी (तालवाद्य) रुदेश फोंडेकर (ध्वनिसंकल्पना ) व निर्मिती प्रमुख प्रदीप पंडित संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन करणार आहेत.
भाविकांनी व संगीत प्रेमी रसिकांची मोठय़ा संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे देवस्थान समितितर्फे कळविण्यात आले आहे.