द होल थिंग ईज दॅट की भैय्या सबसे बडा रुपय्या
पैशासाठी तोडगेः दिवाळी विशेष भाग-1
सामाजिक आणि आर्थिक विषमता हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पात्रता आहे, शिक्षण आहे, काबाडकष्ट करण्याची तयारी आहे तरी नोकरी मिळत नाही, मिळाली तर मनासारखी मिळत नाही, लायकी नसलेल्यांचे प्रमोशन होते, सगळे प्रयत्न करून सुद्धा व्यवसायात फायदा होत नाही, पैसा टिकत नाही. ही आणि अशी दुसरी बाजू म्हणजे एखादा दिवसभर लोळत पडलेला असतो आणि चारी बाजूंनी त्याच्याकडे पैसा येतो. हे असे का याचे उत्तर निदान माझ्याकडे तरी नाही आहे.. कोणी म्हणतात की पुण्य जर भरपूर असेल तरच पैसा येतो. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी जवळ येत आहे. आपल्या सगळय़ांचीच इच्छा असते की लक्ष्मीने आपल्या घरी कायम वास्तव्य करावे. त्यासाठी आपण प्रयत्नही करतो पूजाअर्चा करतो. काही लोक म्हणतील की बिल गेट्सने कुठे लक्ष्मीपूजन केले? असे लोक सोयीस्करपणे विसरतात स्टीव्ह जॉब्स, फेसबुकच्या मार्क झुकरबर्गने वेळ आली तेव्हा नीम करोली बाबांचे दर्शन घेतलेच. बुद्धीचा योग्य वापर, स्मार्टनेस, कष्ट करण्याची तयारी याबरोबर नशिबाची साथ लागते हे सत्य आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून किंवा काही नियम पाळून आपण निश्चितपणे आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो. 24 तास उधळपट्टी करणाऱया माणसाने पैसा टिकत नाही असे म्हणणे ज्याप्रमाणे हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे 24 तास देव देव करून पैसा येणार असे म्हणणे देखील हास्यास्पद आहे. या लेखाचा उद्देश वेळ, साधन, श्रद्धा यांचा उपयोग करून पैश्याचा येणारा मार्ग खुला करण्याचे तोडगे सांगण्याचा आहे. चला सुरु करूया.
1. पूर्व दिशा ही रवी आणि मंगळाची दिशा आहेत. या दिशेला लाकडाचा एक छोटा सूर्य तयार करावा किंवा करवून घ्यावा. त्याचा चेहेरा हसरा असावा. सप्त किरण तांब्याचे असावेत. मध्यभागी सोनेरी रंग द्यावा. मोती जडवावा. डोळे पोवळय़ाचे असावेत. मूर्तीवर लाल वस्त्र घालावे. मूर्तीच्या पाठीमागे स्वस्तिक काढावे. मागे शक्मयतो आरसा ठेवावा. लाल रंगाचा झीरो बल्ब किंवा स्पोट मूर्तीवर सोडावा. हे एक प्रकारचे महायंत्र पैशाचे आगमन सुगम करते.
2. उत्तर दिशेला पांढऱया मार्बलचा चंद्र, पाण्याचा फाउंटन, लहान पवनचक्कीचे मॉडेल ठेवावे.
3. तांब्याच्या तुकडय़ावर षटकोन काढावा. त्यामध्ये आठ पाकळय़ाचे फुल काढावे. हे बहुयंत्र, किंवा पद्मावती यंत्र दक्षिण दिशेस लावावे.
4. नंदादीप कायम असावा.
5. दुकान किंवा व्यवसाय बंद करण्याची वेळ झाली की तेथील वास्तुपुरुषाला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. दुकान बंद करून येतो किंवा बंद करतोय अशी भाषा वापरू नये. दुकान वाढवून येतोय वाढवतोय असे म्हणावे.
6. रद्दी, निरुपयोगी कागदपत्रे, खराब झालेले इलेक्ट्रकिल आणि इलेक्ट्रॉनिक्स सामान, बंद पडलेली घडय़ाळे, जुनी ग्रीटिंग कार्ड किंवा लग्नपत्रिका, वापरात नसलेले कपडे, गंजलेले खिळे किंवा लोखंडी सामान, जुन्या चपला रजा या मोडलेले फर्निचर ताबडतोब घरातून बाहेर काढा.
7. दर पौर्णिमेला आणि अमावस्या ला कापराचेहवन नक्की करावा.
8. रोजची पूजा करत असताना लक्ष्मीला एक लवंग अर्पण करावी. दुसऱया दिवशी ती अभंग एका डबीत काढावी. असे एकशे एकवीस दिवस झाले की त्या सगळय़ा लवंगा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्यात.
9. मोर नाचत असलेल्या जागेची माती तुमच्या घरात अवश्य असावी ती तुम्ही डबीत ठेवू शकता. अशावेळी पडलेले जर मोरपीस मिळाले तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात.
10. मोती, छोटा शंख, हकिक, गोमती चक्र, तांब्याचे नाणे लाल कपडय़ात बांधून ठेवावे.
11. रात्री दह्याचे सेवन पूर्ण बंद करावे.
मेष
नोकरदार वर्गाने या काळामध्ये विशेष काळजी घेतलेली बरी. तुमच्या कष्टांना किंवा तुमच्या कामे पूर्ण करण्याच्या पद्धतीला वरि÷ांकडून दाद मिळेलच असे सांगता येत नाही. तब्येतीला जपावे लागेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती बाहेरगावी जाऊ शकते. शेजाऱयांकडून किंवा लहान भावंडांकडे अपेक्षित मदत मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील.
उपाय पोवळे जवळ ठेवावे.
वृषभ
अति तेलकट किंवा तिखट खाल्ल्याने ऍसिडिटीसारखा त्रास होऊ शकतो. वागण्या बोलण्यामध्ये नम्रपणा ठेवा. तब्येत बिघडू शकते. पैशांची आवक चांगली असेल. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला घेतल्यास कामे पूर्ण होतील. कागदोपत्री व्यवहारात चांगले यश मिळेल. या काळात चांगली झोप मिळणे जरा अवघड दिसते. प्रेम प्रकरणांमध्ये मनस्ताप संभवतो. जोडीदाराकडून चांगली बातमी कळेल.
उपाय पिंपळाला पाणी घालावे.
मिथुन
उत्साहाच्या भरात कोणालाही कुठलेही वचन देऊ नका. कामात घाई केल्यास कामे बिघडू शकतात पैशांची आवक उत्तम असेल. उत्तम कौटुंबिक सुख प्राप्त होईल. लांब राहणाऱया आत्त्याशी भेट होईल. प्रवास सध्या टाळलेला बरा. पैसे बचत करण्याकडे ओढ असेल. सध्याचा काळ हा आयुष्यात तब्येतीविषयी काळजी वाटण्याचा आहे. नोकरीधंद्यामध्ये मानसन्मान वाढण्याबरोबरच आर्थिक लाभही प्राप्त होईल.
उपाय शंकराला बेलपत्र अर्पण करावे.
कर्क
जवळच्या व्यक्तीला भेटण्याकरता गावाला जावे लागू शकते. काही ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे. वसुलीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबामध्ये थोडाबहुत कलह संभवतो. स्थावर संपत्तीच्या बाबतीत जर वाद असतील तर तेच उडण्याची शक्मयता आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरि÷ांचे टोमणे खावे लागतील. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल.
उपाय घरात उत्तरेला पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवावा.
सिंह
स्वतःच्या चुकीमुळे तब्येतीची हेळसांड होण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ामध्ये लहान मोठय़ा अपघातापासून सावध राहावे लागेल. प्रवास शक्मयतो टाळावा. घरातील एखादय़ा सदस्याचे शास्त्री वर्गाशी भांडण होण्याची शक्मयता आहे. आईकडून मदत मिळेल. नोकरदार वर्गाने कामांमध्ये चूक करू नये. धोकादायक गुंतवणुकीतून नुकसान संभवते. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात.
कन्या
या काळामध्ये आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. काही अडचणी जरी असल्या तरी त्यातून मार्ग निघेल. तब्येतीवर परिणाम होऊ देऊ नका. पैशांच्या बाबतीत धीर धरण्याची आवश्यकता आहे. प्रवास घडेल. त्यामुळे मूड प्रेश होईल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल. नोकरदार वर्गाला इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील.
उपाय गाईला चारा घालावा.
तूळ
तब्येतीची काळजी घ्यावी. लिमिटच्या बाहेर काहीही करू नये. पैशांची आवक उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल. घरात एखादे फंक्शन होऊ शकते. प्रवासाला जाण्याचे योग आहेत. वाहन खरेदी किंवा स्थावर मालमत्ता या बाबतीमध्ये नशीब साथ देईल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. प्रेम प्रकरणांमध्ये बदनामी होऊ नये याची काळजी घ्यावी. नोकरदार वर्गाला सहकाऱयांकडून त्रास होण्याची शक्मयता आहे.
उपाय काळय़ा गाईची सेवा करावी.
वृश्चिक
तब्येतीकडे विशेष ध्यान द्यावे असे वाटेल. काही चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे अनाठायी खर्च टाळावा. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. त्यांना तुमच्यामुळे कामात यश देखील मिळू शकते. या काळामध्ये करिअरमध्ये चांगल्या संधी प्राप्त होतील प्रेमसंबंधात थोडा ताणतणाव जाणवेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखद घटना घडेल. उपाय मारुतीच्या मंदिरात बुंदीच्या लाडवा चा नैवेद्य दाखवावा
धनु
जितके आनंदी राहाल तितके तब्येतीचे प्रश्न सुटतील हे ध्यानी घ्या. कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत एखादी लहान सहल एन्जॉय कराल. मनाच्या चंचलतेवर लगाम ठेवणे आवश्यक आहे. नवीन वास्तूसंबंधी किंवा घरात निरीक्षण करण्यासंबंधी चर्चा घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. पैशांची आवक वाढेल. पण जिथे पैसे अडकले आहेत तिथून परत मिळण्याची शक्मयता थोडी कमी आहे. या काळात लोकांशी वैरत्व पत्करू नका.
उपाय काशाच्या वाटीत मुळा ठेवून दान करावा.
मकर
गेल्या काही दिवसांमध्ये तब्येतीच्या तक्रारी असतील तर त्या कमी होणार. खास करून जर पोटासंबंधी काही विकार त्रास देत असतील तर त्याचे निदान सापडेल आणि इलाज चांगला होईल. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये धोकादायक स्थितीपासून सावध राहा. येणाऱया काही दिवसांमध्ये स्वतःच्या चुकीमुळे नुकसान संभवते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीला आणि तुमच्या विचारांना योग्य सन्मान मिळणार नाही.
उपाय बजरंग बाण स्तोत्राचा पाठ करावा.
कुंभ
विचारांमध्ये सकारात्मकता येईल. वागण्या-बोलण्यातून आत्मविश्वास जाणवेल. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहिलात तर करिअरमध्ये संधींचे सोने करू शकाल. वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षित मिळाल्यामुळे एखादे काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान किंवा प्रति÷ा वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसंबंधी किंवा घरासंबंधी कोणताही निर्णय घेण्यापेक्षा चार चौघांना विचारून मग घ्यावा. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर टीका होण्याची शक्मयता आहे.
उपाय पाण्यामध्ये काळे तीळ प्रवाहित करावेत.
मीन
वयस्कर लोकांनी तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पचनतंत्र आणि नर्व्हस सिस्टिम या बाबतीमध्ये थोडा त्रास होऊ शकतो. येणाऱया काळामध्ये मित्रमंडळींसोबत एखाद्या ट्रीपला जाण्याचा प्लॅन कराल. नोकरदार वर्गाने या काळात विशेष सावध राहण्याची गरज आहे. वरि÷ांकडून प्रेशर येऊ शकते. करिअरच्या बाबतीमध्ये थोडे निगेटिव्ह फीडबॅक मिळू शकतात. अशावेळी जे÷ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
उपाय हनुमानचालीसाचा पाठ करावा.