मेष
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उत्साहात कमी आणि आळस यामुळे कामे पूर्ण होण्याकरता अडथळे येऊ शकतात. या आठवडय़ात तुमची भेट अशा एखाद्या व्यक्तीशी होऊ शकते जिच्यामुळे अडचणी काही प्रमाणात कमी होतील. आठवडय़ाच्या मध्यावर कामांचा वेग वाढवावा लागेल. सहकाऱयांशी जुळवून घेऊन कामे केल्यास चांगले परिणाम मिळतील. जुने मित्र भेटतील.
पिवळय़ा कागदावर स्वस्तिक काढून जवळ ठेवा
वृषभ
या आठवडय़ामध्ये चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. या संधी जवळच्या नातेवाईकांमुळे किंवा मित्रांमुळे मिळतील. नोकरदार वर्गाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आठवडय़ाची सुरुवात मनपसंत व्यक्तीच्या भेटण्याने होईल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या तुलनेत तुम्ही काही प्रमाणात रिलॅक्स असाल. कोर्टकचेरीच्या संदर्भात लेखी कामांना पूर्ण करताना सावध राहण्याचा इशारा देत आहे.
बत्तासे दान द्यावे
मिथुन
या आठवडय़ात काही प्रमाणात रिलॅक्स आणि हलके वाटेल. कामांमधील अडचणी दूर होतील. कामे पूर्ण होण्यास वेळ लागला तरी तुम्ही केलेल्या कष्टाचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होईल. मनातील प्लॅन किंवा गुप्त गोष्टी कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रीण असली तरी सांगू नका. घरातील ज्ये÷ व्यक्तीच्या पद्धतीविषयी काळजी वाटू शकते. मुलांच्या अभ्यासावरून आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण राहील. तब्येतीची योग्य ती काळजी घ्या.
मुंग्यांना साखर घालावी
कर्क
दिलेला शब्द पाळावा लागेल. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैसे मागणी करू शकते. ती व्यक्ती विश्वासू आहे की नाही याचा पूर्ण विचार करूनच पैसे द्यायचे की नाही याचा निर्णय घ्यावा. या आठवडय़ात लॉटरी सट्टा किंवा शेअर बाजार यांच्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे. आठवडय़ाच्या शेवटी कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत एखादे छोटे फंक्शन करण्याचा प्लॅन करू शकाल. कापण्या भाजण्यापासून सावध रहा.
हिरवा हात रुमाल जवळ ठेवावा
सिंह
या आठवडय़ात काही घटना अशा घडू शकतात की ज्यामुळे तुमचा स्वाभिमान किंवा इगो दुखावला जाण्याची शक्मयता आहे. अशावेळी मनावर संयम ठेवून भविष्यातील अप्रिय घटना टाळण्याचा प्रयत्न करा. धनप्राप्ती करता कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. कुटुंबात एखादी घटना अशी घडेल की ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. पती-पत्नीमध्ये कलह बऱयाच अंशी कमी होतील. आर्थिक नियोजन योग्य रीतीने केले तर फायदा होईल.
उगवत्या सूर्याचा फोटो जवळ ठेवा
कन्या
पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा ही म्हण या आठवडय़ात बऱयाच अंशी तुमच्या बाबतीत लागू होईल. इतरांनी केलेल्या चुकांमुळे तुम्हाला बरेचसे धडे मिळतील यातून भविष्यात फायदा होऊ शकतो. आर्थिक आवक चांगली असेल. तुमची काळजी घेणारे स्वकीय तुम्हाला योग्य तो सल्ला वेळोवेळी देतील. आठवडय़ाच्या मध्याला कामाचा व्याप वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुकाला पात्र व्हाल. प्रेम संबंध सुधारतील.
धार्मिक स्थळी मध दान द्या
तूळ
आर्थिक किंवा कौटुंबिक बाबतीमध्ये तुम्ही दिलेला सल्ला तुमच्या मित्राच्या कामी येईल. जवळच्या सहकारी मित्राशी वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. घरातील ज्ये÷ व्यक्तीशी सल्ला मसलत करून एखाद्या प्रसंगातून वाट काढाल. पैशांच्या बाबतीत अति दिलदार होऊ नका, आपल्या वेळेला कोण किती मदत करेल याचा अंदाज घेतलेला बरा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. आळस झटकावा लागेल.
वाहत्या पाण्यात तीन कवडय़ा सोडाव्यात
वृश्चिक
तब्येतीची विशेषतः हाडांची आणि सांध्यांची काळजी घेतलेली बरी. या आठवडय़ात लहान मोठय़ा अपघातापासून सावध रहावे लागेल. भाजणे कापणे किंवा लहान जखम होणे अशा घटना घडू शकतात. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. आठवडय़ाच्या मध्याला एखादे मोठे काम हाती लागू शकते. नोकरदार वर्गाने बॉसच्या मर्जीनुसार काम करणे हिताचे ठरेल. छोटा प्रवास संभवतो.
तांब्याचे नाणे जवळ ठेवावे
धनु
चांगला कामांचे फळ चांगलेच मिळते याचा अनुभव या आठवडय़ात येण्याची शक्मयता आहे. तुम्ही दुसऱयांकरता जे करता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना जो फायदा होतो त्याने तुमचेही भले होते हे दाखवणाऱया घटना घडतील. कामाच्या ठिकाणी कष्ट करण्याला पर्याय नसेल. पण त्या कष्टाचेही चीज होईल. घरातील ज्ये÷ व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. आठवडय़ाच्या शेवटी सूचक स्वप्ने पडतील.
गाईची सेवा करावी
मकर
या आठवडय़ात तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. वायरल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. आठवडय़ाची सुरुवात एखाद्या चांगल्या घटनेने होईल. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. अडकलेले पैसे प्रयत्न केले तर वसूल होण्याची शक्मयता आहे. सरकारी कामांकरता एखाद्या व्यक्तीला मनवावे लागेल. घरात शुभकार्या करता पैसे खर्च होतील. एखाद्या कौटुंबिक समारंभात भाग घ्याल. तुमच्यावर ईर्षा करणाऱया लोकांकडे दुर्लक्ष करा.
उडदाचे 5 दाणे जवळ ठेवा
कुंभ
या आठवडय़ामध्ये कारण नसताना एखाद्या गोष्टीची भीती तुम्हाला सतावू शकते पण घाबरण्याचे कुठलेही कारण नाही हे लक्षात ठेवावे. तुमच्यासोबत काम करणाऱया लोकांना विश्वासात घेऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. येणाऱया काळात बऱयाच गोष्टींच्या बाबतीत कन्फ्युजन होऊ शकते. म्हणजे बरेचसे पर्याय तुमच्या पुढे असतील त्यातील योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे असेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
काजळाची डबी जवळ ठेवावी
मीन
सरकार पक्षाकडून लाभाची शक्मयता आहे. तुम्ही ठरवलेल्या कामांना योग्य दिशा मिळून यश मिळेल. एखादी व्यक्ती मध्यस्तीच्या स्वरूपात मदत करेल. घरातील ज्ये÷ व्यक्तींच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत समाधानकारक वातावरण असेल. लहान मुलांविषयी काळजी वाटू शकते. या काळात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ काढा. तुम्ही केलेल्या अर्जाचे अपेक्षित उत्तर मिळण्याची शक्मयता आहे.
पक्ष्यांना दाणे घालावे
उपाय ः एक गोल तांब्याचे मोठे नाणे घ्यावे. त्यावर ग्रीन एवेंचूरीन हा खडा चिकटवावा. बाजूला 808, 741, 520 हे एंजल नंबर कोरावेत. हे यंत्र देवाऱहय़ात ठेवावे. आर्थिक प्रगती, नोकरीत प्रमोशन, व्यवसाय वृद्धी या दृष्टीने हे यंत्र खूप उपयोगी पडते