मेष
आठवडय़ाची सुरुवात काहीशी कंटाळवाणी आणि सावकाश होऊ शकते. महत्त्वाच्या कामांना आठवडय़ाच्या मध्यापूर्वी उरकून घेणे हितावह ठरेल. कारण बुधवार, गुरुवारी एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडण्याची शक्मयता आहे. नवीन नोकरीकरता किंवा नोकरीमध्ये बदल घडावा, अशी इच्छा असणाऱयांना येणारा आठवडा अनुकूल ठरेल. तब्येतीची विशेष तक्रार असणार नाही.
लाजाळूची पाने जवळ ठेवा.
वृषभ
अति चिंता करून किंवा काळजी करून काहीही होणार नाही हे लक्षात घ्या. जोपर्यंत काळ अनुकूल होत नाही तोपर्यंत धैर्य धरून वाटचाल करावी. या आठवडय़ात एखाद्या परिचित व्यक्तीचा समारंभामध्ये भाग घेण्याकरता फोन येऊ शकतो. संतान पक्षाकडून चांगली बातमी कळण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे पेडिट दुसरी एखादी व्यक्ती घेऊ नये, याची काळजी घ्यावी. वैवाहिक सुख उत्तम असेल.
केळीच्या झाडाला पाणी घालावे.
मिथुन
कामानिमित्त प्रवास होईल आणि ज्या ठिकाणी प्रवास होईल त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. जवळच्या एखाद्या व्यक्तीसंबंधी सगळय़ांना माहीत नसलेली बातमी कळण्याची शक्मयता आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला नेमके कुठले काम अगोदर करावे याच्या संभ्रमात असाल. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारल्यास तब्येतीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंधात वाढ होईल.
गरजूला औषधांचे दान द्यावे.
कर्क
प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो हे लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणी आणि घरी योग्य पद्धतीने वागावे लागेल. एखादी व्यक्ती अजाणता किंवा जाणून बुजूनसुद्धा त्रास देऊ शकते. अशावेळी भांडत न बसता दुर्लक्ष केलेले फायद्याचे ठरेल. एखाद्या समारंभामध्ये भाग घ्याल. आठवडय़ाचा मध्य आनंदाची घटना घडवणारा असेल. वैवाहिक जोडीदाराला मदत करा, फायदा होईल.
गरजूंना अन्नदान करा
सिंह
एखादी संधी हातून निघून गेल्याचा पश्चाताप होण्याची शक्मयता आहे. घरी किंवा कामाच्या ठिकाणी राग राग करून काहीही उपयोग होणार नाही. कामाचा व्याप वाढल्यामुळे टेन्शन येण्याची शक्मयता आहे. जुनी येणी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. या आठवडय़ात तुम्हाला एखादी भेट मिळण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांना या आठवडय़ात समाधानकारक आर्थिक लाभ होईल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
दही खाऊन कामाला जावे
कन्या
बरेच दिवस होत नव्हते असे एखादे काम पूर्ण होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. सरकारी कामात किंवा कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होईल. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्मयता आहे. आठवडय़ाची सुरुवात चांगल्या घटनेने होईल. कामाच्या ठिकाणी इतर कोणाचा सल्ला न घेता आपल्या विवेकाने निर्णय घ्यावा. नोकरी करणाऱयांना पॉलिटिक्सचा सामना करावा लागेल.
हिरवा हात रुमाल जवळ ठेवा.
तूळ
प्रवासाला जायचा प्लॅन करावा आणि ऐन वेळेला तो रद्द होण्याचे संकेत मिळावे असा काहीसा योग आहे. या आठवडय़ात चुकूनही कोणालाही आर्थिक मदत करण्याच्या भानगडीत पडू नका, पैसे बुडण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला कट कारस्थानांचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांनी कामानिमित्त प्रवास करत असताना आपल्या सामानाची काळजी घ्यावी. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होण्याची शक्मयता आहे.
पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.
वृश्चिक
एखाद्या घटनेची अपेक्षा करावी आणि घडावे भलतेच असे होण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात तब्येतीची विशेष काळजी घ्या, विशेषतः पोटाच्या विकारांपासून सावध राहण्याची गरज आहे. अनपेक्षित लोकांकडून किंवा ठिकाणाहून कामे मिळतील. त्यातील महत्त्वाच्या कामांना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बुधवार गुरुवारी कौटुंबिक जबाबदारीमुळे कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्मयता आहे.
पाणी असलेल्या विहिरीमध्ये दोन चमचे दूध घाला
धनु
ऐनवेळी एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. पण तुम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरेल याची खात्री बाळगा. कामाच्या ठिकाणी इतर लोकांवर जास्त विसंबून न राहता आपली कामे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला वरि÷ अधिकाऱयांकडून कौतुकाची अपेक्षा करायला हरकत नाही. बरेच दिवस भेटगाठ नसलेली व्यक्ती अचानक भेटल्यामुळे आनंद होईल. वैवाहिक जोडीदाराला एखाद्या गोष्टीसाठी मनवावे लागेल.
पक्ष्यांना दाणे घालावे.
मकर
इतर आठवडय़ांच्या तुलनेने येणारा आठवडा हा कित्येक पटीने चांगला असू शकतो. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त होईल. परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी सावध राहिले नाही तर त्याचा फायदा इतर लोक उचलू शकतात. आर्थिक लाभ उत्तम असेल. व्यावसायिकांना चांगल्या संधी प्राप्त होतील. तब्येत उत्तम असेल. उत्साहात कमी येऊ देऊ नका.
तांब्याचे नाणे जवळ ठेवावे
कुंभ
एखाद्या घटनेचा अति विचार केल्यामुळे मनाला शीण येऊ शकतो. एखादा निर्णय घेण्यासंदर्भात कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने चिडचिड होण्याची शक्मयता आहे. आर्थिकबाबतीत सावध रहा. कोणत्याही धोकादायक योजनेमध्ये गुंतवणूक करू नका. या आठवडय़ात फसवणूक होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. स्त्रीवर्गाने तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोणतेही आजारपण अंगावर काढू नका.
धार्मिक स्थळी दुधाचे दान द्यावे
मीन
आनंददायी घटना घडतील. मन प्रफुल्लित असेल. कामांचा वेग वाढवण्याची गरज आहे. चालढकल केल्यास होणारी कामेही होणार नाहीत. तुमच्या मनातल्या गोष्टी किंवा भविष्याबद्दल केलेले प्लॅन इतर लोकांशी चर्चा केल्यामुळे नुकसान होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी मन विचलित होऊ शकते. कोणी काहीही म्हणाले तरी आपले काम चोख असेल याची काळजी घ्या. या आठवडय़ात अचानक खर्च येऊ शकतो.
भटक्या जनावरांना चारा घाला.
वारंवार दुर्घटना घडत असेल किंवा घरातील एखादा सदस्य कायम आजारी पडत असेल तर घरामध्ये फिश टँक जरूर ठेवावा. त्यात सात सोनेरी मासे आणि दोन काळे मासे सोडावे. त्यांची नीट काळजी घ्यावी. एखादा मासा मेल्यास ताबडतोब बाहेर टाकावा. त्याच रंगाचा नवीन मासा सोडावा.