तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी!!! (भाग 3)
बुद्धाचे शेवटचे वाक्मय होते ‘अप्पो दिपो भव’, स्वत:चा प्रकाश स्वत: बना. इतर ठिकाणी उपायांना, तोडग्यांना हुडकण्यापेक्षा स्वत:तील क्षमतेला ओळखून स्वत:ची उन्नती तुम्ही साधू शकला तर या लेखमालेचे चीज झाले असे मी मानेन. असे समजा की संपूर्ण ब्रह्मांड किंवा विश्व हे कान देऊन तुम्ही स्वत:शी जे बोलता ते ऐकत आहे आणि त्यानुसार ते फळ तुम्हाला देणार आहे. अशा वेळेला जर तुम्ही ‘माझं नशीबच फुटकं’, ‘माझ्या हातून काही होणारच नाही’, ’दरवेळी हे असंच होतं’. ‘माझं काही खरं नाही’, ‘मी कोणतेही काम करायला घेतले की त्यात अडचणी यायलाच पाहिजे’ अशासारखी वाक्ये जर तुमच्या मनात वारंवार घोळवत असाल तर त्या वैश्विक शक्तीला स्वाभाविक आहे वाटेल की या माणसाला असेच व्हावे असे वाटते आणि त्यानुसार लॉ ऑफ व्हायब्र्रेशनच्या नियमाप्रमाणे ती वैश्विक शक्ती त्याच प्रमाणात आणि त्याच प्रकारे फळ तुम्हाला देते. म्हणजे यामध्ये चूक वैश्विक शक्तीची नसून तुमची आहे. किंवा ज्या प्रमाणात/ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या मनाला टेन केले आहे, शिकवले आहे त्याची चूक आहे. ‘मला ज्या प्रकारे जी कामे व्हावीशी वाटतात तशीच ती होतात,’ ‘मला कायम मदत करणारे लोकच भेटतील’. ‘माझ्या हातून चांगली कामे घडतील, ‘या कामात मला यश मिळेलच’ अशा प्रकारची असरमेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह वाक्मयांचा जर तुम्ही कायम मनात उच्चार केला तर त्या वैश्विक शक्तीला त्याप्रमाणे फळ देण्याला तुम्ही बाध्य करता. आता हे संपूर्णत: तुमच्या हातात आहे की कोणत्या प्रकारच्या विचारांना किंवा वाक्मयांना तुमच्या मनात थारा द्यायचा. सोबत काही टिप्स देत आहे त्यांचा उपयोग तुम्ही जरूर करावा.
1. 17 सेकंदांची जादू: या ट्रिकमध्ये तुम्हाला जे हवे आहे ते मिळालेच आहे असे समजून, उमजून, जाणून घेऊन, अनुभव करून त्या अनुषंगाने स्पष्ट, क्लियर आणि नेमकी वाक्मये 17 सेकंदाकरता दिवसातून पाच ते दहा वेळा पुन: पुन्हा म्हणायची आहेत. या ट्रिकमध्ये तुम्ही वैश्विक शक्तीला जे हवे ते नेमकेपणाने आणि वारंवार सांगितल्यामुळे इच्छापूर्ती होते.
2. घरातील किंवा ऑफिसमधील वास्तूचासुद्धा इच्छापूर्ती करता वापर करता येऊ शकतो. तुमच्या घरातील पूर्वेच्या भिंतीवरती, तुमची इच्छा स्पष्ट आणि नेमक्मया शब्दात हिरव्या अक्षरात पिवळ्या कागदावर लिहून चिकटवावी. दिवसातून अनेक वेळेला त्या कागदाकडे लक्ष गेले की ती इच्छा त्याच शब्दात पुन: पुन्हा मनातल्या मनात रिपीट करावी. यामध्ये वास्तु, ज्योतिष आणि लॉ ऑफ व्हायब्र्रेशन किंवा अट्रॅक्शन असा त्रिवेणी संगम साधला आहे.
3. मध्यंतरी फंग शुई शास्त्राचे प्रचंड वेड आपल्याकडे पसरले होते. बघेल त्याच्या घरी क्रिस्टल, बेडूक ई. असायचे. त्या चायनीज शास्त्रापेक्षा आपल्याकडे असलेले कितीतरी असे सिम्बॉल्स आहेत जे चमत्कारिकरित्या काम करतात. वासराला पाजणारी कामधेनु ही आपल्याकडे अत्यंत पवित्र मानली जाते. वासराला पाजत असलेल्या कामधेनूची छोटी मूर्ती उत्तर पश्चिम भागाच्या पूर्वेकडे ठेवावी. त्या मूर्तीखाली पिवळ्या कागदावर हिरव्या शाईने आपली इच्छा लिहून तो कागद ठेवावा. दिवसातून अनेक वेळा मूर्तीखालून कागद काढून वाचावा.
4. आपल्या पुराणांमध्ये पुष्पदंत या गंधर्वाबद्दल चर्चा केली गेलेली आहे. (जैन वाङ्मयात याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो). पिवळ्या कागदावरती हिरव्या शाईने आपली इच्छा लिहून तो कागद पुष्पदंताच्या फोटोच्या मागे चिकटवून तो फोटो पश्चिमेला टांगावा. (समाप्त)
मेष
काही दिवस चित्त विचलित राहण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीसंबंधात किंवा स्थावर मालमत्तेच्या संदर्भात असलेले निर्णय चुकण्याची शक्मयता आहे त्यामुळे ते सध्याला टाळलेले बरे. मंगल कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये बेसावध राहून चालणार नाही. व्यावसायिकांना चांगल्या संधी प्राप्त होतील.
उपाय वाहत्या पाण्यामध्ये सव्वा किलो कोळसे सोडावे
वृषभ
मनात उगीचच अहंकार निर्माण होण्याची शक्मयता आहे. प्रत्येकाने आपले म्हणणे ऐकावे आणि त्यानुसार बघावे असे तुम्हाला वाटू शकते. पण दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणे गरजेचे असेल. कामाच्या ठिकाणी प्रलोभनांना बळी पडू नका. या काळात तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये सौंदर्य दिसू शकते. प्रवास करण्याकडे मनाची ओढ असेल.
उपाय काळे पांढरे तीळ दान द्या
मिथुन
मन चंचल राहण्याची शक्मयता आहे. कोणताही निर्णय घेताना सारासार विचार करूनच घ्यावा. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकते. स्वभावामध्ये मोहकता येईल. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. अशावेळी स्वत:चे मत दुसऱ्यांवर न लादलेले बरे. आर्थिक आवक तुमच्या मनाप्रमाणे न झाल्याने नवीन संधी शोधाल. उपाय पांढऱ्या गाईला चारा घालावा
कर्क
सध्याचा काळ हा भावनिक संघर्षाचा काळ आहे हे समजून घेतल्यास बऱ्याच ठिकाणी निराशा होणार नाही. मनात येणाऱ्या उग्र विचारांवरती लगाम घातला तर बरीच कामे सोपी होतील. जवळच्या व्यक्तींचा आधार मिळू शकतो. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. प्रेम प्रकरणांमध्ये सफलता प्राप्त होण्याची शक्मयता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपाय ताक दान द्यावे
सिंह
सगळ्या प्रकारच्या लाभांची शक्मयता आहे. मित्रमंडळींची भेट होऊन त्यांच्याबरोबर चांगल्या प्रकारे वेळ घालवाल. अनावश्यक खर्च होऊ शकतात. आर्थिक बाबतीमध्ये येणारा काळ चांगला असेल. मातेच्या तब्येतीला मात्र जपावे लागेल. कौटुंबिक मतभेद कमी होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे सहकार्य प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी नैराश्य दूर ठेवा.
उपाय देवीला कुंकुमार्चन करावे
कन्या
कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये नावलौकिक वाढेल. व्यावसायिकांना नवीन संधी प्राप्त होतील. नोकरी करणाऱ्यांना कष्ट जास्त घ्यावे लागतील पण त्याचा परतावा चांगला मिळेल. आर्थिकदृष्ट्या अनुकूल काळ आहे. गूढशास्त्राची आवड असणाऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळू शकते.
उपाय जोड केळ्यांचे दान द्यावे
तूळ
तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. लहानसहान गोष्टी करतानासुद्धा संपूर्ण आत्मविश्वासाने करू शकणार नाही. मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे असेल. आर्थिक आवक चांगली असेल. प्रवासामध्ये धनहानी होण्याची शक्मयता आहे. लहान मोठ्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. प्रेमसंबंध बहरतील. वैवाहिक आयुष्य उत्तम असेल.
उपाय उडीद दान द्या
वृश्चिक
जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकते. जे लोक कमिशन बेसिस वर काम करतात त्यांना चांगला नफा होईल. व्यावसायिकांना त्यांच्या ओळखीमधून नवीन कंत्राट मिळू शकते. नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा इन्क्रिमेंटसारख्या आर्थिक लाभाचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये कटुता येऊ शकते.
उपाय शिवलिंगावर जल अर्पण करावे
धनु
पूर्वी होऊन गेलेली पुन्हा त्रास देऊ शकतात. ज्यांना स्नायूतंत्रिकेचा त्रास आहे त्यांनी विशेष करून सावध राहण्याची गरज आहे. मनोरंजन करता किंवा रोजच्या ऊटीनमधून ब्र्रेक म्हणून बाहेर गावाला भेट देऊ शकता. त्यामुळे मन प्रसन्न होईल. काम करण्याचा नव्याने हुरूप येईल. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे.
उपाय दूध दान द्यावे
मकर
आर्थिक कमाईच्या बाबतीत इतर सर्व राशींपेक्षा नशीबवान असाल. पैसे साठवण्याकडे कल असेल. कौटुंबिक बाबतीमध्ये समाधान प्राप्त होईल. मंगल कार्यात भाग घेताना आपली मते प्रकर्षाने मांडू नका, वाद होऊ शकतो. स्थावर मालमत्तेच्या बाबतीमध्ये चांगली बातमी कळू शकते. आईच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्मयता आहे.
उपाय हिना अत्तर वापरावे
कुंभ
या काळात नवीन जोश आणि आत्मविश्वास जाणवेल, ज्याच्या जोरावर तुम्ही इतर लोकांवर आपले वर्चस्व स्थापित करू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वाने लोक प्रभावित होतील पण याचा व्यर्थ अभिमान येऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय चुकू शकतात. नक्की मिळणार असे वाटत असणारी संधी थोडक्मयात चुकू शकते.
उपाय महादेवाच्या मंदिरात दीप लावावा
मीन
धावपळ जास्त झाल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. मज्जातंतूंचा विकार असलेल्यांना विशेष सावध राहण्याची गरज आहे. पैशांच्या बाबतीमध्ये नशीबवान असाल. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. शेअर बाजारासारख्या बेभरवशाच्या गुंतवणुकीमध्ये लक्ष घालू नका. नोकरदार वर्गाला फायदा असेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
उपाय चांदीचा तुकडा जवळ ठेवा.