मेष-
या आठवड्यामध्ये तब्येत थोडी नरम गरम असू शकते. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट मिळतील, पण अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाजू सर्वसामान्य असेल.
जांभळा हात रूमाल जवळ ठेवावा.
वृषभ-
धनप्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होतील. पैसे साठवण्याकडे कल असेल. एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैशांची मागणी करेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती दुराग्रह करू शकते. आरोग्याच्यादृष्टीने थोडा त्रासदायक आठवडा असेल. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या चुकीचा आता त्रास होऊ शकतो.
मजुरांना दूध दान द्यावे.
मिथुन-
एफडी किंवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्याकरता योग्य काळ आहे. नोकरदार वर्गाला कामाचा बोजा वाढल्याने त्रास होऊ शकतो. तब्येत बिघडल्यास त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. पुढे जाऊन याचा जास्त त्रास होऊ शकतो. काम करत असताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
भीमसेनी कापूर जवळ ठेवावा.
कर्क –
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकरता खर्च करावा लागू शकतो. पण खर्च करत असताना आपल्या खिशाकडे लक्ष असू द्या. नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त बाहेर गावी जाणे संभव आहे. शक्मयतो गैरसमजाला थारा देऊ नका. गुंतवणूक करत असताना योग्य परतावा मिळेल, याची काळजी घ्यावी.
वडिलांना स्वत:च्या हाताने दूध द्या.
सिंह –
या आठवड्यात मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. नवीन काम करण्याची संधी प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक कामे एकाच वेळी लागल्याने त्रास होऊ शकतो. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडण्याची शक्मयता आहे.
दीप दान करावे
कन्या –
घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. कष्टाचा परतावा मिळण्याकरता वेळ लागू शकतो. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्ती होऊ शकते. पण यामुळे गर्व येऊ देऊ नका किंवा अधिकाराचा गैरवापर करू नका. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असेल.
अन्न दान करा.
तूळ –
वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधाचा प्रयोग करू नये. अंगदुखी किंवा पाठीचे दुखणे त्रास देऊ शकते. आर्थिक बाजू सर्वसाधारण असली तरी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या तब्येतीबरोबरच कुटुंबीयांच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी लागेल.
गरजूला वस्त्र दान करा.
वृश्चिक –
जुन्या नातेवाईकांना भेटण्याची संधी प्राप्त होईल. कुटुंबात मंगलकार्य घडेल. सर्व कुटुंब एखाद दुसऱ्या गावाला भेट देऊ शकता. एखाद्या समारंभामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. एखाद्या जाणकार आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्याने नुकसान टळू शकते. कठोर बोलण्याने शत्रुत्व निर्माण होईल.
पाच नाणी दान द्यावी.
धनु-
कुटुंबात छोटे मोठे कार्यक्रम होऊ शकतात. ज्याने मन आनंदी होईल. कुटुंबातील व्यक्तींची समजूत काढताना त्रास होऊ शकतो. आपल्या कामांबद्दल गुप्तता राखा. पैशांची आवक वाढल्यामुळे समाधान प्राप्त होईल. एखाद्या छोट्या समारंभात भाग घेऊ शकाल.
आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दही घाला.
मकर-
पोटाच्या तक्रारींनी त्रस्त होण्याची शक्मयता आहे. पचेल इतकेच खाणे आणि झेपेल इतकेच काम करणे, या आठवड्यात आवश्यक ठरेल. नाहीतर तब्येतीच्या तक्रारी येऊ शकतात. सहज बोलण्यात एखाद्या व्यक्तीशी वादावादी होऊन शत्रुत्व येण्याची शक्मयता आहे. मित्रांचा जास्त सहवास टाळा.
हीना अत्तर वापरावे.
कुंभ-
आळस सोडून कामाला लागला तर यश तुमचेच आहे. बाहेरगावच्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे नवीन कामे मिळू शकतात. एखादे नवे नाते सुरू होऊ शकते. जुन्या नात्यांमध्ये काहीशी तेढ जाणवेल. घरात एखादा धार्मिक समारंभ साजरा कराल. पाहुण्यांचे आगमन होईल.
मातीच्या भांड्यात मध घालून घरी ठेवा
मीन –
औषधे वेळेवर घेतली तर तब्येतीची तक्रार होणार नाही. कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाईगडबड करू नका. एखादे काम सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू देऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असेल. कामासंबंधी एखादी बातमी कळेल, ज्याचा पुढे फायदा होऊ शकतो.
शालेय वस्तूचे दान द्यावे.
आलेला पैसा टिकत नाही, अशी अनेक जणांची तक्रार असते. पैसा येतो, पण खर्च करायला बारा वाटा अगोदरच तयार असतात. याकरता तिजोरीमध्ये एका तमालपत्रावर स्वत:चे नाव हिरव्या स्केचपेनने लिहून त्यावर दालचिनीची काडी ठेवून, हळकुंड ठेवून या सगळ्याला लाल पिवळा धागा लपेटावा. त्याचबरोबर यावर पायराइट क्रिस्टल ठेवावा.