जून महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1, 2, 3 स 11 प, 6 दु 2 प, 7, 8 सायं 7 प, 10,11,12, 13 स 10 नं, 14 दु 2 नं, 15 दु 2 प, 19 दु 12 नं, 20,21, 23, 24, 26 दु 1.30 नं, 27,28, 29 दु 3 प, 30
2 अशुभ दिवस 4, 5, 9, 16, 17, 18, 22, 25
3 सण/ उत्सव/ विशेष तिथी 3-वट पौर्णिमा, 7- संकष्ट चतुर्थी, 14- योगिनी एकादशी, 29- देव शयनी एकादशी- चतुर्मास आरंभ, बकरी ईद
4 अमावास्या/पौर्णिमा अमावास्या 17-06-2023 सकाळी 09.12 ते 18-06-2023 सकाळी 10.07 पर्यंत पौर्णिमा: 03-06-2023 सकाळी 11.18 ते 04-06-2023 सकाळी 09.11 पर्यंत
5 साखरपुड्याचे मुहूर्त 1, 7, 8 सायं 5 प, 11 दु 3 नं, 12, 13, 14 दु 2 प, 23,27,28, 30
6 बारसे (नामकरण) मुहूर्त 1, 8 सायं 7 प, 10 दु 2 प, 12 स 11 नं, 14 दु 2 प, 20, 28, 30
7 जावळाचे मुहूर्त 1, 8, 14 दु 2 प, 21, 28
8 भूमिपूजनाचे/पायाभरणीचे मुहूर्त 8 सायं 6 प, 11 दु 12 प
9 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहूर्त) 1, 8, 10, 12 स 11 नं, 14 दु 2 प, 21, 28, 29
10 वास्तूशांतीचे मुहूर्त 1 सायं 4 प, 8 सायं 4 प, 10 दु 3.30 प, 12 स 10.34 ते सायं 4 प
11 व्यापार सुरू करण्याचे मुहूर्त 12 स 10.45 नं, 26 दु 1.30 नं, 28 दु 4 प, 30 दु 4.30 नं
12 वाहन खरेदीचे मुहूर्त 1,4, 8 दु 1.30 नं, 26 दु 1.30 नं, 28, 29 दु 3 प, 30 दु 4.10 नं
13 शेत जमीन/जागा/प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 23, 24
14 शेती कामांसाठी उपयुक्त दिवस 2, 6, 10,11, 24, 29 दु 5 प
15 डोहाळे मुहूर्त 8 सायं 7 प, 20,21, 26 दु 1 नं, 27 दु 3 प, 30 दु 4 नं
16 पंचक शुक्रवार 09-06-2023 दु 06.04 ते मंगळवार 13-06-2023 दुपारी 01.33 पर्यंत
मेष –
या काळामध्ये आरोग्याला सगळ्यात अधिक महत्त्व द्यावे लागेल. केलेली गुंतवणूक चांगला फायदा देऊ शकते. नवीन नोकरी करता किंवा नोकरीमध्ये बदल घडावा, अशी इच्छा असणाऱ्यांना येणारा आठवडा अनुकूल ठरेल. वैवाहिक जीवनात कलहपूर्ण घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या.
उपाय – लाजाळूची पाने जवळ ठेवा.
वृषभ –
आरोग्य ठीकठाक असेल. या आठवड्यात एखाद्या परिचित व्यक्तीचा समारंभामध्ये भाग घेण्याकरता फोन येऊ शकतो. धन साठवणे म्हणजे, धन कमावणे हे लक्षात घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे व्रेडिट दुसरी एखादी व्यक्ती घेऊ नये याची काळजी घ्यावी.
उपाय- केळीच्या झाडाला पाणी घालावे.
मिथुन-
लहान भावाशी चांगल्या पद्धतीने बोलल्यास लाभ होईल. भावंडांच्या मदतीकरता खर्च करावा लागेल. जवळच्या एखाद्या व्यक्तीसंबंधी सगळ्यांना माहीत नसलेली बातमी कळण्याची शक्मयता आहे. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम स्वीकारल्यास तब्येतीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
उपाय- गरजूला औषधांचे दान द्यावे.
कर्क-
पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उष्णतेचा त्रास होण्याची शक्मयता आहे. एखादी व्यक्ती जाणून बुजून त्रास देऊ शकते. एखाद्या फंक्शनमध्ये भाग घ्याल, जिथे पुढे जाऊन उपयोग होईल अशी ओळख होण्याची शक्मयता आहे. आठवड्याचा मध्य आनंदाची घटना घडवणारा असेल.
उपाय- गरजूंना अन्नदान करा.
सिंह-
तब्येत सुधारेल. मन धार्मिकतेकडे वळू शकते. थोरामोठ्यांचा आशीर्वाद कामी येईल. कामाचा व्याप वाढल्यामुळे टेन्शन येण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात तुम्हाला एखादा उपहार किंवा गिफ्ट मिळण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांना या आठवड्यात समाधानकारक आर्थिक लाभ होईल.
उपाय- दही खाऊन कामाला जावे.
कन्या-
नवविवाहितांना हा काळ आनंदी ठरण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदारावर अरेरावी किंवा वर्चस्व गाजवू नका. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्मयता आहे. आठवड्याची सुऊवात चांगल्या घटनेने होईल. कामाच्या ठिकाणी इतर कोणाचा सल्ला न घेता, आपल्या विवेकाने निर्णय घ्यावा.
उपाय- हिरवा हातरुमाल जवळ ठेवा.
तूळ-
सार्वजनिक ठिकाणी खाण्या-पिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. गुंतवणूक करताना सावध रहा. पैसे बुडण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांनी कामानिमित्त प्रवास करत असताना आपल्या सामानाची काळजी घ्यावी.
उपाय- पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.
वृश्चिक-
ज्यांना अगोदरच आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यांनी या काळात विशेष सावध राहणे गरजेचे असेल. अनपेक्षित लोकांकडून किंवा ठिकाणाहून कामे मिळतील. त्यातील महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बुधवार, गुऊवारी कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
उपाय- विहिरीमध्ये दोन चमचे दूध घाला.
धनु-
प्रॉपर्टीच्या संदर्भात चांगली बातमी कळू शकते. स्थावर मालमत्तेपासून लाभाचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी इतर लोकांवर जास्त विसंबून न राहता आपली कामे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बरेच दिवस भेट गाठ नसलेली व्यक्ती अचानक भेटल्यामुळे आनंद होईल. वैवाहिक जोडीदाराला मनवावे लागेल.
उपाय- पक्ष्यांना दाणे घालावे.
मकर-
पित्ताचा त्रास होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. पचनशक्ती सुधारण्याकरता विशेष प्रयत्न करावा लागेल. शारीरिक थकवा जास्त असेल. कामाच्या ठिकाणी सावध रहा नाहीतर, त्याचा फायदा इतर लोक उचलू शकतात. आर्थिक लाभ उत्तम असेल. व्यावसायिकांना चांगल्या संधी प्राप्त होतील. तब्येत उत्तम असेल.
उपाय- तांब्याचे नाणे जवळ ठेवावे.
कुंभ-
आरोग्याच्या बाबतीत नशीबवान असाल. घरातील सगळ्या व्यक्ती मिळून एखाद्या निर्णयावर येण्याची शक्मयता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना दहावेळा विचार करा. कोणत्याही ‘धोकादायक स्कीम’मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. नोकरदार वर्गाला कामाचे चीज होईल, असे वाटेल.
उपाय- धार्मिकस्थळी दुधाचे दान द्यावे.
मीन-
‘आनंददायी’ घटना घडतील. प्रवास करायचा झाल्यास, सगळ्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कामाच्या ठिकाणी मन विचलित होऊ शकते. मंगल कार्याकरता खर्च होऊ शकतो. पूर्वी केलेले ‘पुण्य’ कामी येईल. समाजात मानसन्मान वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.
उपाय- भटक्या जनावरांना चारा घाला.