लगीन घाई!!!( भाग-1)
या लेखमालेचा उद्देश विवाहसंबंधी असलेल्या समस्या, वास्तविकता आणि विवाह जुळण्याकरता, विवाह सुखमय होण्याकरता करावयाचे उपाय याबद्दल चर्चा करणे हा आहे. वाचकाच्या विनंतीला मान देऊन आणि विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा लेख लिहीत आहे. मुला मुलींची लग्ने जुळवताना येणाऱ्या समस्या, प्रेम विवाहातील गुंतागुंत, विवाहानंतर निर्माण होणाऱ्या समस्या, मुलाची किंवा मुलीची अवास्तव अपेक्षा इत्यादी मुद्यांवर ही चर्चा असेल. उपवर मुला-मुलींची तिशी उलटून जाते, पण मुलांना मुली मिळत नाहीत, मुलींना मुलं मिळत नाही, (एकीकडे लोकसंख्या विस्फोट होत असताना उपवर मुले मुली जातात कुठे हा संशोधनाचा विषय आहे!) एखादा मुलगा किंवा मुलगी पसंत पडला/पडली तर एकतर राहण्याचे ठिकाण पसंत पडत नाही, हाती असलेली नोकरी आवडत नाही, एकत्र कुटुंब पद्धत असते (ज्याच्याकडे पाहण्याचा आजकालच्या मुलींचा दृष्टिकोन वेगळाच आहे), सगळे जुळले तर कुंडली जुळत नाही, त्यात मंगळाचा बागुलबुवा आहेच! आपल्या समाजामध्येच विवाह करून देण्याच्या अति हट्टामुळे आज पारशी समाजाची काय परिस्थिती आहे हे आपण पाहतो. जात नाही ती जात असे म्हणतात!! आपल्याच समाजाचा, आपल्याच वर्णाचा, किंवा जातीचा मुलगा हवा किंवा मुलगी हवी आहे असा असलेला पालकांचा हट्ट इत्यादी अनेक कारणे या मागे असू शकतात. विवाह थाटामाटात पार पडला आणि काही महिन्यातच फिस्कटला आहे अशी अनेक उदाहरणे आपण रोजच्या आयुष्यात बघतो. ज्योतिषीयदृष्ट्या उशिरा विवाहाचे योग, लवकर विवाहाचे योग, घटस्फोट आणि तत्सम घटना घडण्यामागची ग्रहांची भूमिका याबद्दलदेखील चर्चा केली जाईल. एका वाचक मित्राचा फोन आला, त्याने कळकळून विनंती केली की विवाहाबद्दल आणि विवाहासाठी असलेल्या उपायांबद्दल लेख लिहावा. मनात एक प्रकारचे काहूर उठले की आजची विवाह संस्था, सनातन संस्कृतीने सांगितलेले विवाह संस्कार, आणि उद्याचे असणारे भयाण वास्तव याबद्दल लिहिणे गरजेचे आहे. विवाहासाठी कुंडल्यांचे मिलन करत असताना (गुण-मिलन आज आऊट डेटेड झाले आहे) ज्योतिषांवर असलेली जबाबदारी, होणाऱ्या वधूवरांचे ज्योतिषीय समुपदेशन (कौन्सिलिंग) हा देखील विषय चर्चेला घेण्यात येईल. ज्योतिषांकडे येणाऱ्या जातकांपैकी 90 टक्के प्रश्न हे विवाह संदर्भात असतात हे वास्तव आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुली किंवा मुलाबद्दल विचारायला आलेल्या पालकांचा एक प्रश्न हमखास असतो की याचा किंवा हिचा विवाह कधी होणार? विवाहसुख चांगले आहे ना? हे जरी आजचे प्रश्न असले तरी साधारण 30-40 वर्षानंतर विवाहाच्या बाबतीमध्ये असणारे प्रश्न काहीसे वेगळे असतील. ‘याला/हिला विवाहात रस असणार आहे का?’ ‘विवाह करणार का? की लिव-इन मध्ये राहणार?’ ‘समलैंगिक विवाह तर नाही ना करणार?’ आज जरी हे विचारले जात नसले तरी उद्या हे प्रश्न नक्की विचारले जातील आणि तेव्हाच्या ज्योतिषांना अशा प्रश्न ची उत्तरे शोधण्यास संशोधन करावेच लागेल हे सत्य आहे. प्रश्न विचारण्याच्या बाबतीमध्ये भारतीय मानसिकता आणि पाश्चात्य मानसिकता यात फरक आहे. आपल्याकडचे लोक घडणेबद्दल जास्त विचार करतात किंवा विचारतात आणि पाश्चात्य लोक कौन्सिलिंग किंवा समुपदेशक या दृष्टीने ज्योतिषाकडे बघतात.
मेष
गुंतवणूक करण्याकरता सध्याचा काळ अनुकूल नाही. पैशांची गुंतवणूक करत असताना पुढचा विचार करणे आवश्यक असेल. कर्जाकरता प्रयत्न करत असाल तर एखाद्या व्यक्तीची मदत मिळू शकते. भावंडांची योग्यवेळी साथ मिळाल्याने अवघड कामे पूर्ण होतील. घराच्या दुरूस्तीकरता खर्च करावा लागू शकतो.
उपाय 5 कवड्या जवळ ठेवा
वृषभ
विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचे नीट नियोजन केले आणि सातत्य राखले तर हमखास यश मिळेल. संततीविषयक शुभ समाचार प्राप्त होतील. जे लोक संततीकरता प्रयत्न करत आहेत त्यांच्याकरता काळ अनुकूल आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य मार्गानेच पैसा कमावण्याचा प्रयत्न करा.
उपाय गणपतीला दुर्वांची माळ अर्पण करा
मिथुन
स्वत:बरोबरच घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. पैशांच्या बाबतीमध्ये काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही पण वायफळ खर्च करू नये. जुन्या मित्रांसोबत पार्टीला जाऊ शकता. ऑफिसमध्ये एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकते. वरिष्ठांच्या शब्दाबाहेर जाऊ नका.
उपाय: देवीला लाल फुल अर्पण करावे
कर्क
शक्मयतो शांत राहण्याचा प्रयत्न करावा. बाहेरचे खाणे टाळलेले बरे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा वास्तव हट्ट पुरवावा लागेल. मंगल कार्याकरता बाहेरगावी जाऊ शकता. पैसा मिळवण्यापेक्षा तो कसा टिकेल याकडे लक्ष देणे गरजेचे असेल. नको त्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्यता आहे.
उपाय कन्या पूजन करावे
सिंह
तब्येत चांगली रहावी म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य प्राप्त झाल्याने काही कामे लवकर पूर्ण होतील. एकंदरीत कौटुंबिक वातावरण चांगले असेल. नोकरदार वर्गाने वाढीव पगाराची अपेक्षा करायला हरकत नाही. कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधत असताना योग्य शब्दांची निवड करणे गरजेचे असेल.
उपाय: वृद्ध व्यक्तीला दूध दान द्या
कन्या
पोट बिघडू शकते. काही महत्त्वाच्या कामांना विलंब लागू शकतो. आर्थिकदृष्ट्या हा काळ सर्वसामान्य असेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील. कोणताही आर्थिक व्यवहार करत असताना सावध राहणे गरजेचे असेल. शक्य असल्यास प्रवास टाळावा. अपेक्षित बातमी कळेल.
उपाय काळ्या गायीची सेवा करा
तूळ
एखाद्या घटनेमुळे भावंडांविषयी तुमचे मत थोडे बदलू शकते. कोणत्याही कागदपत्रांवर सही करत असताना सावध रहा. व्यक्ती कितीही जवळची असेल तरी कागदोपत्री व्यवहारात चूक होऊ देऊ नका. पाण्याच्या ठिकाणी किंवा उंच जागेला जाणे शक्मयतो टाळा. प्रॉपर्टी संदर्भात अडलेली कामे पूर्ण होतील अशी आशा निर्माण होईल.
उपाय वस्त्र दान द्या
वृश्चिक
सिर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा आणि स्वत:ला सांभाळा. कामांना व्यवस्थित नियोजन करून पार पाडण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक समाधानाच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. तुमच्या निर्णयामुळे घरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आर्थिकबाबतीत एखादी चांगली बातमी कळण्याची शक्मयता आहे.
उपाय काळे कपडे वापरू नका
धनु
ऑफिसमध्ये कामाचे टेन्शन येऊ शकते. पण कामे पूर्ण होतील. प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे असेल. प्रॉपर्टी संदर्भात व्यवहारांमध्ये तुम्ही जरी तडजोडीला तयार असला तरी समोरची व्यक्ती अनाठाई मागणी करू शकते.
उपाय मनगटावर पिवळा धागा बांधा
मकर
तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. पैशांच्याबाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. पार्टनरशिपमध्ये नवीन बिजनेस सुऊ करण्याचा विचार करत असाल तर कागदोपत्री व्यवहार व्यवस्थित करून मगच पुढचे पाऊल टाका. भावंडांशी असलेले वाद टोकाला जाऊ नयेत हे पाहणे गरजेचे असेल.
उपाय अन्न दान करा
कुंभ
प्रवासात शारीरिक त्रास होऊ शकतो. लांबचा प्रवास करत असताना योग्य ती काळजी घ्या. घरातील वस्तूंच्या सुरक्षेसाठी विशेष प्रबंध करावे लागतील. लहान मोठी चोरी किंवा त्यासारखे नुकसान होण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. संततीच्या प्रगतीबद्दल काळजी वाटेल.
उपाय लहान मुलांना मिठाई द्या
मीन
अति टेन्शन घेण्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्मयतो शांत राहण्याचा प्रयत्न करावा. पैशांना योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करा, चांगला फ़ायदा होऊ शकतो. तुमच्याकडे माहिती पुष्कळ आहे पण त्या माहितीचा योग्य उपयोग करता येत नाही अशी काहीशी परिस्थिती असेल.
उपाय महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करा