खजाना – 27-09-2023
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1, 3सायं 6 नं, 6,7,8, 9 दु 1 नं, 10, 11 सायं 6 प, 15 स 10 नं, 18 दु 1 प, 20,21, 22 स 9 नं, 23, 24, 25 दु 1 नं, 26, 31 स 10 प
2 अशुभ दिवस 2, 5, 12, 13, 14, 19, 27, 29, 30
3 सण/ उत्सव/ विशेष तिथी 2-गांधी जयंती+संकष्ट चतुर्थी(चंद्रोदय रा. 8.39), 10-इंदिरा एकादशी, 15-घटस्थापना व नवरात्रारंभ, 23-खंडेनवमी, 24-दसरा, 25-पाषांकुशा एकादशी, 26-संत बाळूमामा जन्मोत्सव, 28- महषी वाल्मिकी जयंती, 30-पंत बाळेकुन्द्री उत्सव
4 अमावस्या/ पौर्णिमा महालय (सर्व पितृ अमावस्या)अमावस्या-13-10-2023 रात्रौ 09.50 ते 14-10-2023 रात्रौ 11.24 पर्येंत ? पौर्णिमा- 27-10-2023 उत्तर रात्रौ 04.17 ते 28-10-2023 रात्रौ 09.53 पर्येंत
5 साखरपुड्याचे मुहुर्त 16- रात्रौ 08.00 प, 18-दु 1 प, 20, 22, 23, 24, 26
6 बारसे (नाव ठेवण्याचे) मुहुर्त 16, 23, 24, 26 स 11 नं
7 जावळाचे मुहुर्त 16, 23, 24
8 भूमिपुजनाचे/ पायाभरणीचे मुहुर्त — मुहूर्त नाहीत —
9 गृहप्रवेशाचे मुहुर्त (व्यवहारीक मुहुर्त) 16, 20, 22 स 09 नं
10 वास्तूशांतीचे मुहुर्त(व्यवहारीक) — मुहूर्त नाहीत —
11 व्यापार सुऊ करण्याचे मुहुर्त 1, 18 स 08 ते दु 1 प, 22 स 09 नं, 24
12 वाहन खरेदीचे मुहुर्त 4, 8, 15, 23, 25
13 शेत जमीन/जागा/ प्रॉपर्टी/ फ्लॅट खरेदी साठीचे मुहुर्त 4, 9, 10, 19, 20
14 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 6, 8,9, 16, 20,23 सायं 06.30 प, 24, 25 दु 1.30 नं, 31 स 09.30 प
15 डोहाळे मुहुर्त 16, 20, 22 स 9 नं
16 पंचक 24-10-2023 मंगळवार सकाळी 04.21 ते 28-10-2023 शनीवर सकाळी 07.31 पर्येंत
ऑक्टोबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
विशेष सूचना: महालय (महाळ) मास आरंभ:29-09-2023 (पौर्णिमा श्राद्ध) ते 14-10-2023 (सर्वपित्री अमावस्या)
विशेष सूचना- वरील मुहूर्त आणि इतर माहिती ही वेगवेगळ्या पंचांगांच्या आधारे आणि स्वानुभवाने दिलेले आहे. लौकिक मुहूर्त म्हणून याकडे बघावे. विवाह आणि उपनयन याचे मुहूर्त दिलेले नाहीत. कारण पत्रिकांचा सखोल अभ्यास करून हे मुहूर्त काढावेत, असे माझे मत आहे.
मेष
पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. प्रवासातून लाभ होईल. नवीन योजना बनवाल. वाहन सुख उत्तम असेल. आईचे सहकार्य मिळेल. .प्रेम प्रसंगात मधुरता निर्माण होईल. नोकरदारांना कष्टाचा काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. लांबच्या ठिकाणांहून फायदा होईल.
उपाय – गाईला चपाती आणि गुळ खायला खायला घाला
वृषभ
आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्मयता आहे. धनप्राप्ती कष्टांनी होईल. प्रवासात नुकसानीची शक्मयता आहे. वाहन आणि स्थावर जमिनीचे सुख उत्तम मिळेल. प्रेम प्रसंगात निराशा होऊ शकते. नोकरदारांना चांगले दिवस आहेत. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. मान सन्मान प्राप्त होईल.
उपाय- पांढरे तीळ घालून चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे
मिथुन
बिघडलेली तब्येत सुधारेल. पैशांची आवक उत्तम असेल. घरात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. प्रवास टाळावा. वाहन सूख उत्तम आहे. छोट्या गुंतवणूकीतून फ़ायदा होईल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस आहेत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कष्टाची तयारी ठेवावी. गुप्त शत्रू नाव बदनाम करण्याची शक्मयता आहे. सावध असावे.
उपाय – गरजू व्यक्तीला चप्पल भेट द्या
कर्क
तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये विश्वास ठेवता येण्यासारखे किती जण आहेत. याचा साक्षात्कार करून देणारा हा आठवडा असेल. आयत्या वेळी कोण कामाला येतो, हे तुम्हाला कळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. पैशांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. प्रेमी जनांनी पुढचा विचार करावा.
उपाय- लाल रंगाचा हात ऊमाल जवळ ठेवावा
सिंह
आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतील. आत्मकि आनंद मिळेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू शकतात. नवीन एफडी कराल. दागिने खरेदीचे योग आहेत. प्रवासातून फायदा होईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. संततीबद्दल चिंता वाटेल. वैवाहिक जोडीदाराशी छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते. प्रयत्न केल्यास सगळ्या प्रकारचे लाभ होतील.
उपाय – केशराचा टिळा कपाळी लावावा
कन्या
तुम्ही तुमच्या पूर्ण ‘क्षमतेनिशी’ लक्ष पूर्ण करण्याकरता प्रयत्न कराल. यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांची मदत द्यावी लागू शकते. काही बाबतीमध्ये तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील. एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्म\यता असेल. पैसे जास्त खर्च झाल्याने आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. स्वभावातील जास्त उदारता घातक ठरू शकते.
उपाय – पिवळा हात रूमाल जवळ ठेवावा
तूळ
मन चलबिचल असू शकते. लोकांच्या संपर्कात तुम्ही जास्त असाल. डोळसपणे निर्णय घेणे योग्य ठरेल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. संयम, नियोजन आणि सारासार विचार या गोष्टींची काळजी घेतली तर, कुठलेही ध्येय अप्राप्य असणार नाही. आखलेल्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये मधुरता येईल.
उपाय – दिव्यांगाना आर्थिक मदत करावी
वृश्चिक
आत्मविश्वासात वाढ होईल. कामांना गती मिळेल. परिवारात वाद हौऊ शकतात. धन प्राप्तीकरता अधिक कष्ट करावे लागतील. कामानिमित्त प्रवास घडून शकतो. आईचा सल्ला उपयोगी ठरेल. प्रेम संबंधात वृद्धी होईल. तब्येतीला विशेष जपावे लागेल. हवामानाचे बदल तब्येतीवर परिणाम करू शकतात. नोकर वर्गाला कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल.
उपाय – लहान मुलींना काजळ भेट द्यावे
धनु
धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्मयता आहे. कुटुंबात छोटेखानी समारंभ होईल. लेखी व्यवहारात सावध असावे. घरासाठी नवीन फर्निचर घेण्याचा विचार कराल. ‘छोट्या गुंतवणुकीतून’ फायदा होईल. संतती सुख उत्तम असेल. नोकरीत वरिष्ठांना सहयोग मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. कष्टाच्या मानाने परतावा मात्र कमी असेल.
उपाय – मुंग्यांना साखर घालावी
मकर
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्वचेसंबंधी विकार उद्भवू शकतात. मनात असून देखील ‘धनसंचय’ होणे अवघड असेल. कुटुंबातील वातावरणाला बिघडवणारी घटना घडू शकते. जमिनीसंबंधी व्यवहारात अडचणी येऊ शकतात. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग आहेत. अचानक धनलाभ संभवतो. गुऊतुल्य व्यक्तीची साथ मिळेल.
उपाय – औदुंबराच्या झाडाला हळद घालून पाणी घालावे
कुंभ
तुमच्या बोलण्यामुळे एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. बोलताना शब्दांचा वापर काळजी पूर्वक करावा. ‘आर्थिक आवक’ समाधानकारक असणार नाही. कुटुंबात वाद संभवतो. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे मन उदास असेल. जोडीदाराच्या वागण्याचा त्रास होईल. वाहन चालवताना सावध राहावे.
उपाय – कुंभाराला दुधाचे दान द्यावे
मीन
हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल. कित्येक संधी तुमच्या समोर उभ्या राहतील. पण त्यातल्या ‘योग्य संधींची’ निवड करणे महत्त्वाचं ठरेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य हेही महत्त्वाचे आहे. चिडचिड केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. पारिवारिकदृष्ट्या हा काळ अनुकूल आहे. पैशांची आवक चांगली असेल.
उपाय – काळा हाकीक जवळ ठेवावा